शिवसेना पक्षाच्या (शिंदे गट) बहुजन विभागाच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदी सुकुमार मारुतीराव शिरगावकर यांची निवड...!

0

शिवसेना पक्षाच्या (शिंदे गट) बहुजन विभागाच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदी सुकुमार मारुतीराव शिरगावकर यांची निवड...!

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

प्रतिनिधी: मिलिंद पाटील.

शिवसेनाप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र राज्य बहुजन विभाग शिवसेना पक्षाचे मुख्य समन्वयक आ.श्री. राम पंडागळे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य बहुजन विभागाचे उपाध्यक्ष राहुलदेव पवार आणि संपर्कप्रमुख चंद्रकांत गायकवाड यांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार महाराष्ट्रात रुजवण्यासाठी यांच्या विचारांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी आणि शिवसेना पक्षाचे कार्य विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी सुकुमार शिरगावकर यांची शिवसेना पक्षाच्या बहुजन विभाग कोल्हापूर जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली.

यापूर्वी सुकुमार शिरगांवकर यांनी वेगवेगळ्या संघटनेमध्ये विविध कामाचा अनुभव घेतला असून त्यामधून जनसंपर्क तयार केला आहे. यामध्ये  लोकांना संघटित करून योग्य मार्गदर्शन करून तालुक्यातील आणि जिल्ह्यातील लोकांना संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, विधवा पेन्शन योजना, रेशन कार्ड विभक्त, लोकांना वेगवेगळे योजनातून मोफत औषध उपचार, आणि ऑपरेशन करून देणे बेरोजगारांना नोकरीचे उद्योगधंदे संधी निर्माण करून देणे, व त्यांच्या कलागुणांना वाव देणे महिला बचत गट स्थापन करून त्यांना शासनाचे अनुदान मिळवून देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे संधी उपलब्ध करून देणे, बहुजन समाज आणि सर्वसामान्य लोकांच्या वर होणारा अन्याय त्यांच्या हक्कासाठी आंदोलने मोर्चे काढून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने लढा देणे, अशा वेगवेगळ्या माध्यमातून  योग्य विचारधारेतून काम केल्याने व त्यांच्या कार्याचा आलेख पाहून शिवसेना पक्षाच्या बहुजन विभागाची जबाबदारी शिरगांवकर यांच्यावर सोपविण्यात आली आतापर्यंत केलेल्या कामाची पोच पावती मला मिळाली असून मला मिळालेला जिल्हा प्रमुख पदाचा मान हा जिल्ह्यातील तमाम शिवसेना प्रेमी आणि बहुजनांचा मान सन्मान आहे इथून पुढे देखील आपण पक्षाची ध्येय धोरणे सांभाळून पक्ष वाढीसाठी लोकांचे त्याची कामे करणार असल्याचे आणि पक्षाने आपल्यावर टाकलेली जबाबदारी आणि विश्वास याला पात्र राहून काम करून या पदाचा लोककल्याणासाठी वापर करणार असल्याचे शिरगांवकर यांनी बोलताना सांगितले. या कार्यक्रमाला मा.आ.राम पंडागळे, राहुल देव पवार, जगदीश गायकवाड उपस्थित होते. यावेळी आमदार राम पंडागळे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top