*सांगलीतील मौजे डिग्रज येथे शेतकरी संघटनेचे नेते माननीय जयपाल अण्णा फराटे यांचा जाहीर सत्कार समारंभ संपन्न--*

0

 *सांगलीतील मौजे डिग्रज येथे शेतकरी संघटनेचे नेते माननीय जयपाल अण्णा फराटे यांचा जाहीर सत्कार समारंभ संपन्न--* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी* ) आज पर्यंत शेतकरी संघटनेच्या आंदोलनातून उभे झालेले नेतृत्व म्हणजे शेतकऱ्यांच्या रयतेचा राजा व एकेकाळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या पदावर काम केलेले, माननीय जयपाल अण्णा फराटे यांचे सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी दिलेले योगदान न विसरता येण्याजोगे आहे .गेली चाळीस वर्षे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ऊस, कापूस, सोयाबीन, कांदा, धान्ये व कडधान्ये उत्पादन करणाऱ्या अन्नदाता शेतकऱ्यांना रास्त हमीभाव मिळावा यासाठी खस्ता खाल्लेल्या शेतकरी संघटनेच्या उच्चाधिकार समितीचे सदस्य, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशा विविध पदावरुन प्रचंड मोठे काम केलेले मा. जयपाल अण्णा फराटे यांचा जाहिर सत्कार मौजे डिग्रज गावाने केला. सत्कार समितीचे अध्यक्ष मा. भालचंद्र पाटील व प्रा. सिकंदर जमादार, श्रीपाल चौगुले, सरपंच तानाजी जाधव, अनिल हवाणे यांनी सहकाऱ्यांना बरोबर घेऊन उत्कृष्ट नियोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे राजू शेट्टी होते. रघुनाथ दादा पाटील, संजय कोले,विशाल दादा पाटील, महेश खराडे, संदीप राजोबा, राहूल सकळे, संग्राम पाटील,अर्जुन पाटील सर, राजगोंडा पाटील नांद्रे, घाडगे सरकार शिरोळ व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मा. जयपाल फराटे अण्णा यांचे मानपत्र लिहिण्याची व गौरवपर भाषणाची संधी संयोजन समितीने प्राध्यापक हिंडी बिरनाळे कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक सेल मुंबई यांना दिली.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top