सिद्धगिरी कणेरी मठ येथील "पंचमहाभूत लोकोत्सवामध्ये" मृत झालेल्या गाईंबाबत शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचा जाहीर खुलासा.

0

सिद्धगिरी कणेरी मठ येथील "पंचमहाभूत लोकोत्सवामध्ये" मृत झालेल्या गाईंबाबत शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचा जाहीर खुलासा.

-जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी सिद्धगिरी कणेरी मठ येथील मृत गाईबाबत केला जाहीर खुलासा.

 

 प्रतिनिधी  :- मिलिंद पाटील. 

सिद्धगिरी कणेरी मठामार्फत आयोजित केलेल्या "पंचमहाभूत लोकोत्सव" या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. पण पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रमांमध्ये दि.23/2/2023 रोजी दुपारपासून मठातील गोशाळेतील व मुक्त संचार गोठ्यातील 22 जनावरे अत्यवस्थ असल्याचे आढळून आले होते. त्यावेळी अधिक माहिती घेतली असता "पंचमहाभूत लोकोत्सवातील" भेट देणाऱ्या भक्तगणांनी सदर गाईंना चपाती खाऊ घातल्याचे कळाले. त्या अनुषंगाने तात्काळ पशुवैद्यकीय पथकाने योग्य ते उपचार चालू केले. त्यापैकी काही जनावरे बरे झाली पण रात्री 03 जनावरे दगावली. पशुप्रदर्शन स्थळी कार्यरत पशुवैद्यकांनी उपचार केला. तसेच रात्रीही पशुवैद्यक सदर परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कार्यरत होते.

दि. 24/2/2023 रोजी 30 जनावरे आजारी असल्याचे आढळून आल्याचे असता त्यापैकी उपचार चालू असताना 09 जनावरे मयत झाली. मृत जनावरांचे शवविच्छेदन करून त्यांचे योग्य ते नमुने तपासणीसाठी पुणे येथे पुढील निदानासाठी पाठवण्यात आले आले होते. सद्य परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सिद्धगिरी मठावर 02 सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, व 20 पशुधन विकास अधिकारी, 15 पशुधन पर्यवेक्षक, उद्भवलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कार्यरत होते. पुणे येथे पाठवलेल्या अहवालामध्ये असे स्पष्ट झाले आहे की, जठर रस, खाद्यांश म्हणजेच अति अमलीय (ऍसिडिक) पदार्थाचा आहारात समावेश झाल्यामुळे जनावरे दगावल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये विषबाधेचा कोणताही अंश सापडलेला नाही.

यावर प्रसारमाध्यमे/ सोशल मीडिया/ डिजिटल मीडियातून काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी चुकीच्या खेडसाळ बातम्या पसरवून त्यामध्ये 52 पेक्षा जास्त जनावरे दगावल्याचे वृत्तांकन केले होते. त्यात कसलेही तथ्य नसून आज अखेर केवळ 12 जनावरे दगावली आहेत. वस्तुतः एकूण 52 जनावरे बाधित झाल्यामुळे उपचार सुरू असल्याची बाब निदर्शनास आलेली होती. व ती वस्तुस्थिती खरी आहे. त्यानंतर दि. 27/2/2023 रोजीच्या दैनिकांतील कोल्हापूर आवृत्ती मधील प्रसिद्ध झालेल्या बातमीमध्ये शिळे अन्न खाल्ल्यामुळे कणेरी मठावरील गाई दगावल्याचे रोग अन्वेषण प्रयोग शाळेच्या अहवालावरून स्पष्ट झालेले आहे. असे विधान डॉ.वाय.ए.पठाण यांनी केलेचे  नमूद केले असल्याचे छापून आले होते. वास्तविक पाहता नमुने पुणे येथे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आलेले होते.त्यामुळे प्रसार माध्यमे/ सोशल मीडिया/ डिजिटल मीडिया माध्यमांतून जे काही मठातील गोशाळेच्या बाबतीत चुकीचे वार्तांकन झालेले आहे. ते पूर्णतः चुकीचे व साफ खोटे आहे. असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी आपल्या खुलासा मधून स्पष्ट केलेले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top