*कर्नाटक राज्यातील बेळगाव शहर हवेच्या प्रदूषणाबाबतीत सर्वात पहिल्या क्रमांकावर असून सद्यस्थितीत धोकादायक पातळीवर ---*

0

 *कर्नाटक राज्यातील बेळगाव शहर हवेच्या प्रदूषणाबाबतीत सर्वात पहिल्या क्रमांकावर असून सद्यस्थितीत धोकादायक पातळीवर ---* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी* )



 कर्नाटक राज्यातील बेळगाव शहर आता हवेच्या प्रदूषणाबाबतीत, धोकादायक स्थितीत पोहोचले असून, प्रदूषणाची पातळी पूर्वीपेक्षा सध्या सात पट वाढली आहे. कर्नाटक राज्यातील बेळगाव शहर हे हवेच्या प्रदूषणाबाबतीत, पहिल्या क्रमांकावर असून, त्यानंतर गुलबर्गा शहर दुसऱ्या क्रमांकावर तसेच बेंगळूर शहर हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान धारवाड व हुबळी हे हवेच्या प्रदूषणाबाबती अनुक्रमे पाच व सहा क्रमांकावर आहेत. कर्नाटक राज्यातील बेळगाव हे शहर, पूर्वी एकेकाळी थंड हवेचे महाबळेश्वर सारखे ठिकाण म्हणून ओळखले जात होते. या ठिकाणी सध्या पीएम 2.5 या घटकाचे हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढल्यामुळे, ही स्थिती झाली आहे. जागतिक आयक्यूएअर या स्वित्झरलँड मधील असलेल्या संस्थेने केलेल्या सर्वेनुसार ,कर्नाटक राज्यातील बेळगाव शहर हवेच्या प्रदूषणाबाबतीत 159 क्रमांकावर पोहचले आहे. बेळगाव शहरवासियांची या हवेच्या प्रदूषणामुळे चिंता वाढली असून, याचा परिणाम शहरवासीयांच्या आरोग्याच्या रोगावर म्हणजे दमा, हृदयविकार, फुफुसाचे विकार आदी आरोग्याच्या  विकारांमध्ये रूपांतरीत होत आहे .जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार पीएम 2.5 या घटकाचे हवेतील प्रमाण, हे सर्वसाधारण धोकादायक स्थिती हवेच्या प्रदूषणाबाबतीत समजले जाते. बेळगाव शहरवासीयांच्या दृष्टीने पीएम 2.5 या घटकाचे हवेतील प्रमाण, धोकादायक स्थितीत असल्यामुळे आरोग्यास फार मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल असे वाटत आहे. गेल्या काही वर्षापासून बेळगाव शहरात विविध विकास कामे सुरू असून, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रमाणात वृक्षतोड झालेली असून ,शहराच्या आसपास नागरिक वसाहतीकरणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कर्नाटक शासन याबाबतीत काय उपाययोजना करेल? हे सध्या तरी पाहणे योग्य ठरेल.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top