कृष्णा नदी मध्ये दूषित पाणी सोडल्यामुळे, वसंतदादा कारखाना प्रदूषण महामंडळाने बंद केला तसेच महापालिका ही बंद करणार काय?. - कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुभाष खोत

0

कृष्णा नदी मध्ये दूषित पाणी सोडल्यामुळे, वसंतदादा कारखाना प्रदूषण महामंडळाने बंद केला तसेच महापालिका ही बंद करणार काय?.-- कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुभाष खोत.


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

 ( अनिल जोशी )

सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये अनेक कारखान्याचे मळी मिश्रित पाणी व महापालिकेचे सांडपाणी मिसळल्यामुळे ,लाखो माशांना प्राणास मुकावे लागले म्हणून प्रदूषण महामंडळाने वसंतदादा कारखाना बंद केला. त्याचप्रमाणे महापालिकेला सुद्धा सांडपाणी सोडल्यामुळे नोटीस दिलेली आहे ,मग महापालिका बंद करणार काय? असा सवाल सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुभाष खोत यांनी प्रदूषण महामंडळ यांना विचारला आहे.

त्याचप्रमाणे सांगली ,मिरज ,कुपवाड एमआयडीसी मध्ये अनेक कारखाने दूषित पाणी सोडत आहेत .त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो एकर जमीन नापीक झालेली आहे. त्या कारखान्यामध्ये सह्याद्री टॉर्च , राहुल डाईंग, पोतदार केमिकल असे अनेक कारखाने चालू आहेत .मग हे कारखाने प्रदूषण महामंडळ बंद करणार का?. जिल्हा प्रदूषण मंडळ झोपले आहे काय?. कृष्णा नदीतील मासे मेल्यानंतर प्रदूषण मंडळ जागी झाले आहे. जिल्ह्यातील हवा प्रदूषण करणारे कारखाने व पाणी दूषित करणारे कारखाने यांच्यावर ताबडतोब कारवाई न केल्यास प्रदूषण महामंडळासमोर ,सर्व शेतकऱ्यांना व नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा शेवटी सुभाष खोत यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top