सांगलीत सांगली रेल्वे स्टेशनच्या विविध मागण्यांसाठी बाबतीत, नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा च्या वतीने रेल रोको आंदोलनाचा इशारा---

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी )

 सांगली रेल्वे स्टेशन सांगली शहराच्या मध्यवर्ती भागात असून जगातील सर्वात मोठ्या हळदी बाजारपेठेपासून दोन मिनिटांच्या अंतरावर आहे.  सांगलीतील मार्केट यार्ड येथे असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजारपेठेत लोक येऊन जाऊन करू शकतील त्यासाठी सांगलीचे रेल्वे स्टेशन योग्य नियोजन करून सांगली मार्केट यार्ड शेजारीच बांधण्यात आले होते. 

पण सांगली रेल्वे स्टेशन वरून बेळगाव पंढरपूर सोलापूर लोंढा हुबळी इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या रेल्वे गाड्या दिवसभरात नसल्यामुळे सांगली च्या व्यापार उद्योग शिक्षण व कृषी क्षेत्राला खूप मोठा फटका बसत आहे.

नागरिक जागृती मंचने मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय रेल्वे मॅनेजर यांची दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी सांगली रेल्वे स्टेशन येथे भेट घेऊन सांगली रेल्वे स्टेशन वरून पंढरपूर बेळगाव सोलापूर इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी केली होती.

या मागणीवर रेल्वे प्रशासनाने काहीही कार्यवाही न केल्यामुळे दिनांक 23 जानेवारी रोजी नागरी जागृती मंचने रेल्वे प्रशासनाला पुन्हा एक निवेदन पाठवून सांगली रेल्वे स्टेशन वरून काही नवीन गाड्या व काही रेल्वे गाड्यांचा थांबा सांगली रेल्वे स्टेशनवर देण्याची विनंती केली व रेल्वे प्रशासनाला 30 दिवसांची मुदत देण्यात आली. या मुदतीत सांगली रेल्वे स्टेशन वरून मागणी करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या सुरू झाल्या नाहीत तर रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा देखील नागरिक जागृती मंचने दिला होता.


तीस दिवसांची मुदत संपल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने सांगली रेल्वे स्टेशन साठी कुठलीही कारवाई केली नाही व कुठल्याही नवीन गाड्या सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिक जागृती मंचने रेल्वे प्रशासनाला 24 फेब्रुवारी 2023 रोजी पुन्हा एक निवेदन पाठवून दहा दिवसांची अंतिम मुदत दिली असून ती मुदत देखील संपत आलेली आहे.

नागरिक जागृती मंचने सांगली रेल्वे स्टेशन सल्लागार समितीच्या सर्व सदस्यांना देखील या निवेदनाची कॉपी पाठवून वरील मागण्या रेल्वे प्रशासनाकडून मंजूर करून घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर नागरिक जागृती मंच ने रेल्वे प्रवासी संघटना व रेल्वे सल्लागार समितीच्या काही सदस्यांबरोबर चर्चा केली.

पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रुप  व रेल्वे सल्लागार समितीतील काही सदस्यांनी नागरिक जागृती मंचच्या मागण्या रेल्वे प्रशासनाने त्वरित मान्य करून रेल्वे रोको आंदोलन टाळावा अशी विनंती रेल्वे प्रशासनाला केली आहे. वारकरी विठ्ठल भक्त समुदाय तसेच सांगली शहरातील अनेक संस्थांनी नागरिक जागृती मंचच्या रेल रोको आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.

नागरिक जागृती समितीने दिलेल्या मागण्या मान्य करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे आणखीन काही दिवस आहेत. या कालावधीत रेल्वे प्रशासनाने नागरिक जागृती मंचच्या मागण्या मान्य करून सांगली रेल्वे स्टेशन वरून पंढरपूर बेळगाव सोलापूर लोंढा हुबळी या गाड्या दिवसाच्या वेळेत लवकरात लवकर सुरू केल्या तर रेल्वे रोको आंदोलन टळू शकते.

आता सर्व काही रेल्वे प्रशासनावर अवलंबून आहे. सर्वांची नजर आता रेल्वे प्रशासनावर आहे की रेल्वे प्रशासन सांगली रेल्वे स्टेशन वरून नवीन गाड्या सुरू करणे व सांगली रेल्वे स्टेशनवर काही गाड्यांना थांबा देते की रेल रोको आंदोलन होते? याच कालावधीत रेल्वे प्रशासनाने कर्नाटकातील चिकोडी रोड या रेल्वेस्थानकावर दोन रेल्वे गाड्यांचा थांबा दिला व कर्नाटकातील उगार रेल्वे स्थानकावर एका गाडीचा थांबा दिला आहे. एक मार्च रोजी रेल मंत्रालयाने कर्नाटकातील हे थांबे मंजूर केले आहेत‌. सांगली पेक्षा खूपच लहान असलेल्या चिकोडी व उगार या रेल्वे स्थानकांवर जर रेल्वे थांबे व रेल्वे गाड्या देण्यात येतात तर सांगली सारख्या जिल्हा मुख्यालय व महानगरपालिका मुख्यालय असलेल्या मोठ्या शहराच्या मुख्य रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाड्या का सुरू होऊ शकत नाहीत ?असा प्रश्न नागरिक जागृती मंचचे नेते सतीश साखळकर यांनी केला आहे केला आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top