*सांगलीत आज जुनी पेन्शन योजना लागू होण्याच्या मागणीसाठी शासकीय ,निमशासकीय ,शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचा प्रचंड मोर्चा--*

0

 *सांगलीत आज जुनी पेन्शन योजना लागू होण्याच्या मागणीसाठी शासकीय ,निमशासकीय ,शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचा प्रचंड मोर्चा--* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 ( *अनिल जोशी* )



 सांगलीत आज, जुनी पेन्शन योजना लागू होण्याच्या मागणीसाठी, शासकीय, निमशासकीय, शिक्षक व इतर शिक्षकेतर संघटनांचा प्रचंड मोर्चा आयोजित काढण्यात आला होता व आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होऊन ,मोर्चा राम मंदिर मार्गे  स्टेशन चौकात आला व मोर्चातील सर्व नेत्यांनी, मोर्चेतील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्यांच्या बाबतीत प्रयत्न करण्याचे अाश्वस्त करून, या मोर्चाची सांगता झाली निमशासकीय, शासकीय, शिक्षक व शिक्षकेतर संघटनांच्या मोर्चात, मोर्चाचे निमंत्रक पृथ्वीराज पाटील यांचे सह आमदार विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, आमदार अरुण लाड ,महापौर दिग्विजय सूर्यवंशी ,रोहित पाटील, माजी महापौर सुरेश पाटील ,माजी आमदार भगवानराव साळुंखे, शिक्षक समितीचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ मिरजकर, जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर आदी नेते उपस्थित होते.



 "एकच मिशन, जुनी पेन्शन"," नो पेन्शन, नो वोट" अशा घोषणा मोर्चातील मागण्यांचे लक्ष वेधून घेत होत्या. मोर्चातील महिला कर्मचाऱ्यांचा प्रचंड प्रमाणातील सहभाग हा मोर्चातील वैशिष्ट्य म्हणावे लागेल." एकच मिशन, जुनी पेन्शन" आधी घोषणांच्या टोप्या मोर्चेकरांनी डोक्यावर घातल्या होत्या. स्टेशन चौकातील सभेत आमदार अरुण लाड यांनी पेन्शनच्या बाबतीत, महाविकास आघाडीचा कर्मचाऱ्यांना पाठिंबा आहे असे सांगितले. त्याचबरोबर महापौर दिग्विजय सूर्यवंशी, रोहित पाटील आदींनी सुद्धा सभेत, शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जुनी पेन्शन लागू होण्यासाठी आम्ही सदैव पाठीशी असून ,कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे असे भाषणात सांगितले. आमदार विक्रम सावंत यांनी जुनी पेन्शन लागू होण्यासाठी ,काँग्रेस पक्षाने पाठपुरावा केला असून, पेन्शन कर्मचाऱ्यांना देण्यासाठी साठी सरकारला भाग पाडू असे सांगितले.



 सभेच्या सुरुवातीस जुन्या पेन्शनचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी प्रास्ताविक करून, प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी सूत्रसंचालन केले व प्रा. अरविंद जैनापुरे यांनी आभार मानले .शिवाय सभेत राज्य नेते विश्वनाथ मिरजकर अरुण खरमाटे यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबतीत, आपले विचार मांडले. जुनी पेन्शन योजना लागू होण्याच्या मागणीसाठी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सरकारी, निमसरकारी कर्मचारी 14 तारखेपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. एकंदरीत आजचा शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर सर्व संघटनांचा मोर्चा प्रचंड मोठा होता तसेच या मोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top