*सांगलीत आज अखिल भारतीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ, जिल्हा काँग्रेसच्यावतीने कॅन्डल मार्च.------*

0

 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*

( *अनिल जोशी* )



सांगलीत आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार, सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दल, ओबीसी, अल्पसंख्यांक व सर्व संघटनांच्या वतीने, देशाचे नेते अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष  राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ ,काँग्रेस भवन सांगली येथून जुना स्टेशन चौक येथील महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत, कॅण्डल मार्च काढण्यात आला.




सदरच्या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नंदकुमार कुंभार ,सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले ,सेवादलाचे प्रदेश सचिव पैगंबर शेख ,ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अशोक सिंग राजपूत, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष देशभूषण पाटील, मौलाली वंटमोरे, बाबगोंडा पाटील, आशिष कोरी, आरगेचे भानुदास कोकरे, आदिनाथ मगदूम ,विजयराव नवले, विठ्ठलराव काळे, नामदेव पठाडे, सेवादलाचे अरुण पळसुले, एडवोकेट भाऊसाहेब पवार ,कांचन खंदारे ,सौ .सीमा कुलकर्णी, वायदंडे मॅडम, आरग चे विनोद गरुड, मुपीत कोळेकर, विश्वास यादव, टाकळी  सुनील गुळवे, शैलेंद्र पिराळे, सुभाष पट्टणशेट्टी, विष्णुपंत घाडगे इत्यादी कार्यकर्ते बहुसंख्येने सदर कॅण्डल मार्चमध्ये उपस्थित होते. काँग्रेस भवन पासून सदरची कॅण्डल मार्च ,मोदी सरकारच्या विरोधामध्ये, राहुल गांधी यांच्या सन्मानाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना नंदकुमार कुंभार यांनी सांगितले की, मोदी सरकारने राहुल गांधींच्या लोकप्रियतेचा धसका घेऊन, त्यांना संसदेमध्ये बोलता येऊ नये, आदानीच्या संदर्भात त्यांनी कुठले प्रश्न विचारू नयेत म्हणून त्यांची खासदारकी रद्द केली. यावेळी बोलताना सेवादलाचे अध्यक्ष अजित ढोले म्हणाले की राहुल गांधी यांनी शेतकरी ,कष्टकरी ,बेरोजगार, युवक- महिलांच्या वर होणाऱ्या अत्याचार ,छोटे व्यापाऱ्यांची आजची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या संदर्भात त्यांनी संसदेमध्ये आवाज उठवला. आदानीच्या घोटाळा संदर्भात ही त्यांनी प्रश्न विचारल्यावर ,या मोदी सरकारने त्यांचे सदस्य रद्द करून संविधानाच्या विरोधामध्ये काम केलेले आहे. अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या आदेशानुसार ही आजची कॅण्डल मार्च आम्ही आयोजित केली होती. त्यामध्ये सर्व संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना पैगंबर शेख यांनी देशातील भाजपचे सरकार, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करीत आहे. त्यांना विरोध करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात इडी असेल ,सीबीआय असेल, यांच्या माध्यमातून नाहक त्रास देऊन कोणतेही विकासाचे काम न करता, ते काँग्रेसने विकासाचे काम केले आहे त्या सर्व संस्था विकण्याचे काम हे मोदी सरकार करीत आहे.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top