भारतातील प्रसिद्ध असलेल्या टाटा मोटर्सच्या ब्रँडची एक नवीन इलेक्ट्रिक सायकल भारतीय बाजारपेठेत उपलब्ध

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

( अनिल जोशी )

भारतातील प्रसिद्ध असलेल्या टाटा मोटर्सच्या एका ब्रँड ने एक नवीन इलेक्ट्रिक सायकल बाजारात उपलब्ध केलेली असून ,त्याची किंमत 31, 999 रुपये इतकी आहे, परंतु सध्या कंपनीच्या एका ऑफर मध्ये ही सायकल ग्राहकांना 25, 599 रुपयांना देऊ केली आहे. ही  इलेक्ट्रिक सायकल दोन रंगांमध्ये उपलब्ध असून, मजबूत 36 V 250 W BLDC रियर हब मोटरने सुसज्ज असून, खडतर रस्त्यावर आरामदायी प्रवास व्हावा अशी डिझाईन केलेली इलेक्ट्रिक सायकल आहे. टाटा मोटर्सच्या बाजारात आणलेल्या इलेक्ट्रिक सायकलची आतली प्रेम ही लिथेनियम -आयन बॅटरी असून, कंट्रोलरसह येते. ही इलेक्ट्रिक सायकल केवळ तीन तासात पूर्ण चार्जिंग होऊन, जवळपास एका चार्जिंग वर 40 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकते असा दावा कंपनीने केला आहे. या इलेक्ट्रिक सायकल मध्ये स्मार्ट ॲटो कॅट ब्रेकसह सेफ्टी फीचर्स असल्यामुळे ,अपघाताचा धोका कमी राहतो. 


या इलेक्ट्रिक सायकलचा खर्च 10 पैसे प्रति किलोमीटर येत असल्याचा दावा कंपनीचा आहे. सद्य परिस्थितीत ही सायकल फॉरेस्ट ग्रील व मॅट ग्रे या दोन रंगात उपलब्ध आहे. भारतीय बाजारपेठेतील कॉलेजमध्ये व शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन ,या सायकलचे डिझाईन करून, याचे नाव Zeeta असे ठेवले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top