*सांगलीत अल्पवयीन १८ वर्षाखालील मुलांनी सार्वजनिक रस्त्यावर वाहने चालू नयेत अन्यथा कारवाईचा इशारा-- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली.*

0

 *सांगलीत अल्पवयीन १८ वर्षाखालील मुलांनी सार्वजनिक रस्त्यावर वाहने चालू नयेत अन्यथा कारवाईचा इशारा-- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली.* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*

( *अनिल जोशी*) सध्या सांगलीत १८ वर्षाखालील अल्पवयीन मुलांकडून, सार्वजनिक रस्त्यावर वाहने चालवण्याचे प्रकार वाढत चालले असून, त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. तरी 18 वर्षाखालील अल्पवयीन मुलांनी, वाहन चालवण्याचा परवाना नसताना, सार्वजनिक रस्त्यावर वाहने चालवू नयेत तसेच पालकांनी त्यांना वाहने चालवण्यास देऊ नयेत असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांचे कडून करण्यात आलेले आहे. गेले दोन महिने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली यांचे कडून, वेगवेगळ्या शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन यासंबंधीचे प्रबोधन चालू आहे. तथापि सदर प्रकारामध्ये घट झाल्याचे दिसून येत नसल्यामुळे, तसेच माननीय जिल्हाधिकारी यांचे कार्यालयामध्ये दिनांक  02/02/ 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये अशा अल्पवयीन चालकांच्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश सांगलीचे मा. जिल्हाधिकारी यांचे कडून देण्यात आलेले आहेत. त्यास अनुसरून आज दिनांक 03/03 2023 रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वतीने ,वायुवेग पथकाने धडक मोहीम सुरू केली असून ,आज रोजी एकूण 20 अल्पवयीन वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून बारा वाहने जप्त करण्यात आलेली आहेत .सदरची मोहीम सांगली शहर व सांगली जिल्ह्यांमध्ये सर्वत्र राबवण्यात येणार असून, सांगली शहर व आसपासच्या नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे तसेच अठरा वर्षाखालील अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देऊ नयेत. सार्वजनिक रस्त्यावर १८ वर्षाखालील अल्पवयीन मुलांनी वाहन चालवण्याचा गुन्हा केला ,तर सदरहू गुन्हा अंतर्गत दोषी आढळणाऱ्या मुलांच्या पालकांना ३ वर्षे कारावास व 25 हजार रुपये दंडाची तरतूद मोटर वाहन कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. तसेच वाहन चालवण्याचा परवाना नसताना वाहन चालवल्यास, चालकास ५००० रुपये दंड व वाहन मालकास ५००० रुपये असा एकूण १०,००० रुपये दंड असलेल्या शिक्षेची तरतूद मोटार वाहन कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. तरी पालकांनी व १८ वर्षाखालील अल्पवयीन पाल्यांनी याची गंभीर दखल घेण्यात यावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top