*महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबत आज गुरुवारी, अखिल भारतीय किसान सभेच्या नेत्यांची मंत्रालयात बैठक ,शेतकरी लाँग मार्चची मुंबईकडे कुच.--*

0

 *महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबत आज गुरुवारी, अखिल भारतीय किसान सभेच्या नेत्यांची मंत्रालयात बैठक ,शेतकरी लाँग मार्चची मुंबईकडे कुच.--* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी* )



महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सोबत, अखिल भारतीय किसान सभेच्या प्रतिनिधी नेत्यांशी ,आज दुपारी 3:00 वाजता मंत्रालयात एक बैठक होणार आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या नेत्यांची , काल राज्य सरकारचे प्रतिनिधी मंत्री दादा भुसे, मंत्री अतुल सावे यांच्यामध्ये बराच काळ चाललेला बैठकीनंतर, आज गुरुवारी दुपारी 3:00 वाजता ,अखिल भारतीय किसान सभेच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाची, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबत बैठक होणार असल्याचे समजले आहे. महाराष्ट्र विधिमंडळात शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय होईतोपर्यंत, अखिल भारतीय किसान सभेचा लाँग मार्च मुंबईकडे कूच करणार आहे .अखिल भारतीय किसान सभेचा ,गेले तीन दिवसापासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी, माजी आमदार जीवा पांडू गावित तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली, हजारों शेतकऱ्यांच्या संख्येने नाशिक पासून लाँग मार्च निघाला आहे.



 यापूर्वी महाराष्ट्र शासनामधील मंत्री दादा भुसे यांनी, लाँग मार्च नाशिक मधून निघाला असताना, अखिल भारतीय किसान सभेच्या प्रतिनिधी मंडळींशी चर्चा केली होती .परंतु मागण्या बाबतीत ठोस निर्णय झाला नसल्यामुळे, लाँग मार्च मुंबईच्या दिशेने कूच केला आहे .आज ठाणे जिल्ह्यात ,अखिल भारतीय किसान सभेचा लाँग मार्च दाखल झाला असून ,ठाणे जिल्ह्यातील शहापूर मधील कलंब गावात लाँग मार्च पोहोचला आहे. महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी मंत्री दादा भुसे आणि अतुल सावे यांच्याशी,भारतीय किसान सभेच्या प्रतिनिधी मंडळींनी दोन तास सकारात्मक बोलणी केल्यानंतर,आज गुरुवारी दुपारी 3:00 वाजता मंत्रालयात, मुख्यमंत्र्यांसोबत, अखिल भारतीय किसान सभेच्या प्रतिनिधी मंडळींची चर्चा होणार आहे. काल झालेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या प्रतिनिधीं बरोबर, महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी मंत्री दादा भुसे , अतुल सावे त्यांच्यातील चर्चेनंतर, अखिल भारतीय किसान सभेच्या 40% मागण्यांची उत्तरे मिळाली आहेत, फक्त उर्वरित मुद्द्यांवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीत निर्णय होण्याची अपेक्षा अाहे. अखिल भारतीय किसान सभेने, संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी, बैठकीच्या वेळी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनासोबत चर्चा सुरू असताना, अखिल भारतीय किसान सभेचा लाँग मार्च सुरू राहणार असल्याची माहिती माजी आमदार पांडू जीवा गावित यांनी दिली आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top