सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने, क्रांतीज्योती ,थोर समाज सुधारक, भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

0

 *सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने, क्रांतीज्योती ,थोर समाज सुधारक, भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न --* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी* ) सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने क्रांतीज्योती, थोर समाज सुधारक, भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज काँग्रेस भवन सांगली येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सौ. मालनताई मोहिते, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सुभाषतात्या खोत यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी फुले वाहून आदरांजली वाहिली .स्वागत प्रास्ताविक मौलाली वंटमोरे व शेवटी आभार अजित ढोले यांनी आभार व्यक्त केले .यावेळी मालनताई मोहिते यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये, सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शिक्षित होऊन, इतर महिलांच्यासाठी त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अत्यंत मोलाचे योगदान दिलेला आहे .आज सावित्रीबाई फुले यांच्यानंतर राजीवजी गांधी यांनी महिलांना राजकीय आरक्षण दिले, तदनंतर यूपीएच्या अध्यक्षा श्रीमती. सोनिया गांधी यांनीही महिलांना आरक्षण देण्याचे काम केले. आज सावित्रीबाई फुले यांच्यामुळे स्त्री सबळ झाली आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपल्या योगदानाने देशाच्या जडणघडणीमध्ये अग्रभागी आहेत. यावेळी एस.टी.इंटक युनियनचे जिल्हाध्यक्ष डी.पी. बनसोडे, मौलाली वंटमोरे,अजित ढोले अध्यक्ष सांगली जिल्हा काँग्रेस सेवादल, श्रीधर बारटक्के,विश्वास यादव, भिमराव चौगुले, प्रकाश माने, अपंग सेलचे सुरेश गायकवाड, इंटक युनियनचे अरुण कांबळे, रावसाहेब पाटील, प्रदीप कांबळे,पद्माकर मिठारे,विष्णू जाधव, राजेंद्र सिंग ठाकूर,शमशाद नायकवडी,जन्नत नायकवडी रजिया अन्सारी,नामदेव पठाडे,बापू चौधरी,मुफित कोळेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top