सांगलीतील प्रतापसिंह उद्यानात विकसित होणार पक्षी उद्यान, शहरवासीयांना व बालचमुंना अनुभवता येणार पक्षांचा किलबिलाट

0

 *सांगलीतील प्रतापसिंह उद्यानात विकसित होणार पक्षी उद्यान, शहरवासीयांना व बालचमुंना अनुभवता येणार पक्षांचा किलबिलाट ----* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी* )



 सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेने प्रताप सिंह उद्यान मध्ये पक्षी उद्यान विकसित होण्यासाठी, दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी च्या महासभेत एक ठराव केला होता. नुकतेच सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगराेत्थान महाअभियाना अंतर्गत, डी.सी.पी. मधून आवश्यक असलेल्या 1 कोटी 16 लाख 92 हजार रुपयांचा निधीस मंजुरी मिळाली असल्याची माहिती दिली आहे . त्याबरोबरच महापालिका प्रशासनास सदरहू माहिती पत्रान्वये प्राप्त झाली आहे अशी माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. सांगली शहरातील असणाऱ्या प्रतापसिंह उद्यानात होणाऱ्या पक्षी उद्यानात, सुमारे 300 ते 400 पक्षांच्या विविध प्रजातींचा समावेश होणार असून, यामध्ये आफ्रिकन ग्रे, ब्ल्यू अँड गोल्ड, आफ्रिकन लवबर्ड्स, शो कबूतर ,टर्की कोंबडी, गीज हंस, चिनी कोंबडा, सन कपूर, लव बर्ड्स इंकलेट्स आदी प्रजातींचा समावेश असून, सुसज्ज असे पक्षी उद्यान प्रतापसिंह उद्यानात सांगलीकर शहरवासीयांना उपलब्ध होणार आहे. सांगली शहरवासीयांची गेले कित्येक वर्षाची मागणी होती, त्यानुसार हे पक्षी उद्यान प्रतापसिंह उद्यानात विकसित होऊन, लहान मुली मुलांना या पक्षांची ओळख होण्यास, पक्षी उद्यानात आनंदाने रमण्यास फार मोठी भर  पडणार आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top