सांगली जिल्ह्यात सांगलीसह पलूस, दुधोंडी, इस्लामपूर आदी गावांच्या ठिकाणी विजेच्या गडगडाटासह पाऊसं.---

0

सांगली जिल्ह्यात सांगलीसह पलूस, दुधोंडी, इस्लामपूर आदी गावांच्या ठिकाणी विजेच्या गडगडाटासह पाऊसं.--- 


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी) काल मध्यरात्री सांगली शहरात विविध ठिकाणी पाऊस झाला आहे. या अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, गहू पिकांचे नुकसान झाले असून, द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. पलूस तालुक्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण पहावयास मिळाले असून ,रात्री नऊच्या सुमारास वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे. पावसाचे प्रमाण कमी असले तरी, द्राक्ष व काढण्यास आलेल्या गहू पिकाला बाधक ठरणार आहे. दरम्यान पलूस तालुक्यातील सावंतपूर, अमणापुर ,विठ्ठलवाडी अन्य आसपासच्या गावात पाऊस झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे काही काळ वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. दुधोंडी परिसरात विजेच्या कडकडाटासह रात्री 9:30 च्या सुमारास अचानक आलेल्या विजेच्या कडकडाटासह पावसामुळे, अनेक ऊस तोडणी कामगारांचे हाल झाले. दुधोंडी परिसरात पाऊस कमी प्रमाणात पडला असला तरी, जोरजोरात विजेचे गडगडाटाचे आवाज येत होते , शिवाय वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना अडचण निर्माण झाली होती. 

इस्लामपूर व वाळवा गावातही सायंकाळी पाऊस जोरदार झाल्याचे वृत्त आहे. अचानक अवकाळी झालेल्या पावसामुळे नागरिकांची व वाहनधारकांची गैरसोय झाली. काही ठिकाणी खड्ड्यातही पाणी साठल्यामुळे, वाहनधारकांना वाहन चालवणे अवघड झाले होते.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top