उत्तर भारतीय समाजातर्फे घोसारवाड येथे प्रभू श्री रामचंद्र, माता सीता, लक्ष्मण, आणि हनुमान यांच्या भव्य मूर्ती प्रदान..!

0

उत्तर भारतीय समाजातर्फे घोसारवाड येथे प्रभू श्री रामचंद्र, माता सीता, लक्ष्मण, आणि हनुमान यांच्या भव्य मूर्ती प्रदान..!

प्रतिनिधी:- अन्सार मुल्ला.

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क :

उत्तर भारतीय समाजाचे उपकार घोसरवाडकर ग्रामस्थ या जन्मात विसरणार नाहीत, अशा भावनिक प्रतिक्रिया आज प्रभू श्री रामचंद्र.   सीता माता,लक्ष्मण, आणि हनुमान यांच्या मूर्ती घोसरवाड कडे रवाना करताना उमटत होत्या.

 गेल्या 70 वर्षांपासून घोसरवाड पंचक्रोशीत भव्य श्रीराम मंदिर व्हावं अशी इथल्या तमाम लोकांची इच्छा होती. मात्र त्यांना या ना त्या कारणाने ते प्रत्यक्षात येत नव्हते. 2017 पासून मंदिर निर्माण साठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू झाले. या प्रयत्नांना यश देखील आले. मात्र मंदिर पूर्णत्वास येत असताना कोरोनाच संकट आणि महापूर या कारणाने पुन्हा एकदा मंदिर निर्माण मध्ये अडथळे निर्माण झाले. या सर्वावर मात करत उत्तर भारतीय लोकांच्या मदतीने अखेर हे मंदिर पूर्णत्वास आले. 

घोसरवाड ग्रामपंचायत मंदिर ट्रस्ट तसेच या पंचक्रोशीतील शेकडो लोक या मूर्तीच्या आगमनासाठी कोल्हापुरात दाखल झाले. ताराबाई पार्क येथील अजय सिंह यांच्या घरी गेल्या दोन दिवसांपासून प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे करवीर वासियांनी दर्शन घेतले. आज सकाळी अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात आणि विधिवत पूजा करीत या मुर्ती घोसरवाड ग्रामस्थांच्या कडे सुपूर्द करण्यात आल्या. वाजत गाजत या मुर्त्या घोसरवाडच्या दिशेने रवाना झाल्या. यावेळी समस्त उत्तर भारतीय समाज सहकुटुंब उपस्थित होते. प्रभू रामचंद्रांचे दर्शन करवीर वासीयांना घडावे यासाठी अजय सिंह, ब्रिजेश उपाध्याय, भवानी सिंग (सरकार), उपदेश सिंग, आणि इतर कोल्हापूरातील उत्तर भारतीय समजातील लोकांनी नियोजन केले होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top