सांगलीत आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयवंतरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ,जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने, मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर संपन्न---

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी) 

     सांगलीत आज, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री मा. जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तसेच सांगली शहर जिल्हा अध्यक्ष मा .संजयजी बजाज साहेब व युवक शहरजिल्हा अध्यक्ष मा राहुलदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली अविरतपणे सुरु असलेल्या महाआरोग्य शिबीरा अंतर्गत आज ०७ जणांची मोतिबिंदू आँपरेशनची ८८ वी बँच पार पडली , सदरचे मोतिबिंदु आँपरेशन पुर्णपणे मोफत करण्यात आले.


यावेळी पेशंटच्या भेटप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाग १४ मधील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी मा पिंटू माने , मा.कुणाल गालिंदे ,मा.वैशालीताई धुमाळ , मा.संतोष कांबळे,तसेच राष्ट्रवादी कुपवाड शहर अध्यक्ष मा.तानाजी गडदे ,राष्ट्रवादी सेवादल चे अध्यक्ष महालिंग हेगडे ,सुरेखा हेगडे ,रोहित आठवले आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कामाचा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रमुख सचिव व विद्यार्थी शहरजिल्हा अध्यक्ष डॉ शुभम जाधव , निलेश शहा, रावसाहेब नलवडे , रोहित आठवले , अजीम मुल्ला, यांनी केला.




Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top