*सांगली मधील कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबती कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचेकडे मागणी--नेते सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच.*

0

 *सांगली मधील कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबती कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचेकडे मागणी--नेते सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच.* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 ( *अनिल जोशी* )



 मागील काही वर्षांमध्ये सांगली मधुन वाहत जाणारी कृष्णा नदी खूपच प्रदुषित होत आहे. गेले कित्येक वर्ष सांगलीतील शेरीनाला हा नदी पात्रात मिसळत आहे. याचे प्रदुषण होतच असताना, नदी प्रदुषणाचे ठिकाण हे फक्त सांगली शेरीनाल्या पुरते मर्यादित न राहता, कृष्णा नदीच्या उगम स्थानापासुन प्रदुषणाची पातळी वाढत आहे.गेल्या काही दिवसांपासुन रासायनिक पाणी नदी पात्रात मिसळत आहे. त्यामुळे नदीमधील मासे हि खुप मोठ्या प्रमाणात मरत आहेत. त्या पाण्यास भयंकर दुर्गंधी येत आहे.हेच पाणी पिण्यासाठी वापरण्यात येते या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास खुप मोठ्या प्रमाणात धोका आहे व नागरिकांना खुप मोठ्या प्रमाणात आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ शकतात. तरी याबाबत लवकरात लवकर उपाय योजना केल्या नाहीत तर, ज्या पद्धतीने नदीतील मासे मरत आहेत त्याच पद्धतीने माणसे हि मरतील याची नोंद घेण्यात यावी.  याबाबतीत प्रदुषण नियंत्रण मंडळाकडुन कोणतीही कार्यवाही होताना दिसुन येत नाही.हा फार मोठा गंभीर विषय असुन हि प्रदुषण रोखण्याबाबतीत प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसुन येत नाही. 



      तरी आपण या नदी प्रदुषण विषयामध्ये लक्ष्य घालुन, कायम स्वरुपी उपाय योजना करण्यासाठी संबधित विभागास योग्य ते आदेश देण्यात यावेत तसेच यासाठी लागणार निधी हि उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी *नागरिक जागृती मंचचे नेते सतीश साखळकर यांनी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे* यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे .

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top