सांगलीतील सांगली रेल्वे स्थानकावर, जोधपूर ते बंगळूर एक्सप्रेस व म्हैसूर ते उदयपूर एक्सप्रेस या दोन गाड्यांना थांबा मंजूर -------

0

  जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

( अनिल जोशी )


     
      सांगली जिल्ह्यातील सर्व रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक आनंदाची बातमी म्हणजे, जोधपूर ते बंगळूर एक्सप्रेस व म्हैसूर ते उदयपूर एक्सप्रेस या दोन गाड्यांना, सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून नुकतेच कळवण्यात आले आहे. सांगली रेल्वे स्टेशन वरील जोधपुर- बंगळूर एक्सप्रेस, म्हैसूर- उदयपूर एक्सप्रेस या दोन गाड्यांना दिलेला थांबा हा प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांसाठी मंजूर करण्यात आला असून ,जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावर वरील दोन गाड्यांना दिलेला थांबा कायम ठेवणे अथवा न ठेवणे याबाबतचा निर्णय रेल्वे प्रशासनाच्या अहवालानंतर, अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान नागरिक  जागृती मंचचे नेते सतीश साखळकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.  


      दक्षिण भारतातील असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील वास्तव्यास असलेल्या रेल्वे प्रवाशांना ही एक आनंदाची पर्वणी आहे असे नागरिक जागृती मंचचे नेते सतीश साखळकर यांनी म्हणले आहे. गेले काही दिवस नागरिक जागृती मंचचे नेते सतीश साखळकर यांच्याकडून व विविध रेल्वे संघटनांच्याकडून या मागणी बाबतची निवेदने वारंवार प्रशासनास देऊन अवगत करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top