*कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केलेला, सर्व कर्जपुरवठा नियमानुसार---बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने .*

0

 *कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केलेला, सर्व कर्जपुरवठा नियमानुसार---बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने .* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 ( *अनिल जोशी* )



 कोल्हापूर मध्ये असलेल्या, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केलेला, सर्व कर्ज पुरवठा नियमानुसार झाला असल्याचे स्पष्टीकरण बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए .बी. माने यांनी दिले आहे .कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे लेखा परीक्षणाचे आदेश सरकारकडून प्राप्त झाल्यानंतर , बँकेच्या प्रशासनाकडून सदरहू कर्ज प्रकरणाबाबत खुलासा करण्यात आलेला आहे, शिवाय सरकारला लेखापरीक्षणासाठी सर्व काही सहकार्य देणार असल्याचे सांगितले आहे .भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनुसार, सदरहू कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत लेखापरीक्षणाचे आदेश सरकारने दिले होते. त्याप्रमाणे चौकशीसाठी नियुक्त केलेले विभागीय सहनिबंधक डी.डी .छत्रीकर (लेखापरीक्षण विभाग) यांनी चौकशी प्रारंभ केलेला आहे. शिखर बँक व नाबार्डच्या धोरणानुसार बँकेने, 29 सहकारी साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा केलेला असून, त्या कर्जपुरवठ्यासाठी  आवश्यक ते तारणही, बँक प्रशासनाकडून घेतले गेलेले आहे. जवळपास 27 साखर कारखान्यांना नियमानुसार कर्ज पुरवठा केलेला असून, चौकशी चालू असलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना व  ब्रिस्क फॅसिलिटीज या दोन्हीही कारखान्यांना सुद्धा कर्ज पुरवठा हा नियमानुसार केलेला आहे. दोन्हीही खाती एन .पी .ए .मध्ये नसल्याचे बँक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top