महाराष्ट्र राज्यात जवळपास 12 लाखांवर विद्यार्थ्यांची, विविध शाखांमधील पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी नोंदणी.--

0
जनप्रतिसाद नेटवर्क
( अनिल जोशी )


महाराष्ट्र राज्यातील, विविध पदवी परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या म्हणजेच इंजिनिअरिंग फार्मसी, एग्रीकल्चर आधी शाखांमधील पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी आतापर्यंत 7 लाख 39 हजार 778 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्याचबरोबर सीईटी सेल कडून 16 पेक्षा अधिक पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांसाठी एकूण 11 लाख 88 हजार 127 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्र राज्यात सीईटी सेल कडून उच्च शिक्षण ,तंत्रशिक्षण, कला, विद्या शाखा अंतर्गत जवळपास 16 पेक्षा अधिक शाखेच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा, दरवर्षीप्रमाणे घेतल्या जातात.


एमएचटी सीईटी परीक्षेसाठी 7 लाख 39 हजार 778 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून,जवळपास 1 लाख 20 हजार 105 विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण अवस्थेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. राज्यातील सीईटी सेल कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पीसीबी ग्रुप मध्ये 2 लाख 96 हजार 99 विद्यार्थ्यांचे, तर पीसीएम ग्रुप साठी 3 लाख 23 हजार 574 विद्यार्थ्यांचे अर्ज भरून शुल्का सहित नोंदणी झाली आहे .त्यामुळे यंदाच्या वर्षीच्या इंजिनिअरिंग प्रवेशासाठी चुरस राहणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान सीईटी सेलकडे एमबीए अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी, 1 लाख 50 हजार 707 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्याचबरोबर 5 वर्षाच्या लॉ अभ्यासक्रमासाठी सीईटी सेल कडे 28 हजार 298 विद्यार्थ्यांनी, तर 3 वर्षे मुदतीच्या ला अभ्यासक्रमासाठी 89 हजार 293 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे .बीपीएड व बीएड या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी सीईटी सेल कडे अनुक्रमे 11 हजार 250 व 1 लाख 2 हजार 326 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्याचबरोबर बीएड- एम एड अभ्यासक्रमासाठी 9483 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. फाईन आर्ट्स व बीए, बीएससी, बीएड या अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे 4 हजार 561 व 4 हजार 633 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी अर्ज भरल्याची सीईटी सेल कडून माहिती प्राप्त झाली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top