मॉरिशस मध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 फुटी उंचीच्या पुतळ्याचा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण समारंभ संपन्न.---

0 

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)


अखंड देशाचे दैवत असलेल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण, आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, मॉरिशस मध्ये झाले.आज झालेल्या मॉरिशस मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 फूट उंचीच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी, मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद कुमार जगन्नाथ हे उपस्थित होते. 


आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 फुटी उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी, संपूर्ण परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने दुमदुमून गेला होता. मॉरिशस मधील मराठी मंडली फेडरेशनला सरकारकडून ही निधी मंजूर केला असून, महाराष्ट्र भवनाच्या विस्तारासाठी 44 दशलक्ष मॉरिशियस रुपये अर्थात भारतीय चलनाचे 8 कोटी रुपये देण्याचा निर्णय, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतला आहे. या निर्णयाची घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी केली. 


दरम्यान मॉरिशस मधील 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार असून, त्यांची नावे पण नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. सध्य परिस्थितीत, मॉरिशसमध्ये मराठी व महाराष्ट्रीयन बांधवांना एकत्र आणण्यासाठी, तसेच सतत संपर्कात राहण्यासाठी एक कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. आज मॉरिशसमध्ये मोठ्या उत्साहात ,संपूर्णपणे महाराष्ट्र राज्याचे मराठी प्रतिबिंब उमटत असलेल्या दिमाखदार सोहळ्यास, मॉरिशसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ॲलन गानू व इतर मंत्री तसेच भारताचे मॉरिशस मधील उच्चायुक्त नंदिनी सिंगला, मॉरिशस मराठी मंडली फेडरेशनच्या अध्यक्ष असंत गोविंद हे प्रामुख्याने उपस्थित होते. आजच्या झालेल्या मॉरिशस मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी, मराठी भगिनी व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकंदरीतच मॉरिशस मधील आजचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचा उद्घाटन सोहळा, दिमाखदार-अत्यंत उत्साहात व आनंदात संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top