खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान समारंभावेळी, उष्माघात होऊन झालेल्या दुर्घटनेतील, 14 श्री सदस्यांचे मृत्यू प्रकरण, जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात दाखल.--

0

 

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)


 खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान समारंभावेळी, उष्माघात होऊन झालेल्या दुर्घटनेतील 14 श्री सदस्यांचा मृत्यूचा मुद्दा आता, मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे .नुकताच खारघर मध्ये परमपूज्य अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता. त्या पुरस्कार प्रदान सोहळ्या च्या वेळी, उष्माघातामुळे 14 श्री सदस्यांचा जो मृत्यू झाला आहे, याचे पडसाद आता जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयापर्यंत गेले आहेत.  खारघर दुर्घटने प्रकरणी संबंधित जबाबदार असणाऱ्या प्रशासनावर, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करणारी जनहित याचिका, सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे, विशेष म्हणजे या जनहित याचिकेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 

मुंबईतील विरार येथील सामाजिक कार्यकर्त्या शैला कंठे यांनी, त्यांचे वकील नितीन सातपुते त्यांच्यामार्फत, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून, या जनहित याचिकेची सुनावणी लवकरच सुरू होण्याची अभिप्रेरित आहे. एकंदरीतच सध्याच्या परिस्थितीत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे दाखल झालेल्या प्रकरणाचा मुद्दा, कोणत्या कारवाईच्या स्तरापर्यंत पोहोचेल  हे सांगता येत नाही?.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top