महाराष्ट्र राज्यातील शाळांचे शैक्षणिक सत्र15 जून पासून सुरू होणार असून, विदर्भातील शाळांचे शैक्षणिक सत्र 30 जून पासून सुरु होणार.-----

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

( अनिल जोशी ) 


 महाराष्ट्र शासनाने नुकताच एक निर्णय घेतला असून राज्यातील सर्व शाळांचे शैक्षणिक सत्र 15 जून 2023 पासून सुरू होणार असून, फक्त विदर्भातील शाळांचे शैक्षणिक सत्र 30 जून 2023 पासून सुरू होणार आहे, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे .राज्यातील शाळांच्या कर्मचाऱ्यांच्या व विद्यार्थ्यांच्यामध्ये संभ्रम राहू नये ,शिवाय सुट्ट्यांचे योग्य ते नियोजन व्हावे यासाठी, चालू वर्षीच्या शैक्षणिक सत्रांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत .सद्यपरिस्थितीत विदर्भातील उन्हाळ्याची तीव्रता व विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता, विदर्भातील शाळा  30 जून 2023 पासून सुरू होणार आहे अशी माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. आज मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेच्यावेळी त्यानी ही माहिती दिली. 


दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेच्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार असून, शाळा पूर्वतयारीचा पहिला मेळावा 26 एप्रिल व दुसरा मेळावा जून महिन्यात घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यंदाच्या वर्षीपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये " आजी आजोबा दिवस " साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व शैक्षणिक शाळांमध्ये, यंदाच्या वर्षीपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पद्धतीने, व्यावसायिक शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. राज्य शासनाने राज्यातील अघोषित शाळांच्या तुकड्यांना, 20% अनुदानासाठी पात्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी निधीची देखील तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील शिक्षक मानधन ,सेवक मानधन तसेच शिष्यवृत्ती मध्ये देखील मोठी वाढ करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top