सांगलीत रविवार दि. 16 एप्रिल 2023 रोजी दुपारी 2:00 वाजता, ऊस वाहतूकदारांचा, तरुण भारत स्टेडियम मध्ये भव्य मेळावा.--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी )सांगलीत आज रविवार दि.16 एप्रिल 2023 रोजी दुपारी 2:00 वाजता, सांगलीतील तरुण भारत स्टेडियम मध्ये, ऊस वाहतूकदारांचा भव्य मेळावा आयोजित केला आहे. दुपारी ठीक 2:00 वाजता विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून, पदयात्रेने ऊस वाहतूकदार, तरुण भारत स्टेडियम येथे येणार आहेत. हा ऊस वाहतूकदारांचा भव्य मेळावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

या मेळाव्यात निमंत्रक म्हणून संदीप राजोबा, स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली जिल्हा हे हजर राहणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील ऊस वाहतूकदारांच्या शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भव्य मेळाव्याचे आयोजन माजी खासदार राजू शेट्टी व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी केले आहे. या मेळाव्यात ऊस वाहतूकदारांच्या विविध प्रमुख मागण्याविषयी आवाज उठवून, शासनाचे लक्ष वेधण्यात येईल. या ऊस वाहतूकदारांच्या भव्य मेळाव्यास, सुनील शेट्टी, विनोद पाटील, सुदर्शन मद्वान्ना, राहुल सकळे, प्रवीण शेट्टी, रावसाहेब आबदान, श्रीकृष्ण पाटील, रावसाहेब पाटील ,दिग्विजय जगदाळे, विठ्ठल पाटील, गणेश गावडे, शिवाजी पाटील, डॉ. अनिल कंन्नुरे ,युवराज माळी, प्रकाश पवार, राजाराम पाटील ,अजित राजोबा, संदीप मगदूम, दादा पाटील, बाबासो पाटील आदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह, सर्व ऊस वाहतूकदार उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top