खारघर येथे आज रविवार दि. 16 एप्रिल 2023 रोजी, ज्येष्ठ निरूपणकार, सत्कर्माचा दिशादर्शक आधारस्तंभ असलेले, पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना, महाराष्ट्र भूषण सन्मानाने विभूषित केले जाणार.--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी )


अख्या महाराष्ट्राला निरूपणकार म्हणून प्रसिद्ध असलेले व सत्कर्माची दिशा देणारे आधारस्तंभ म्हणून ओळखले जात असलेले पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज खारघर येथेआंतरराष्ट्रीय कार्पोरेट मैदानावर महाराष्ट्र भूषण या सन्मानाने विभूषित केले जाणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार म्हणून उपस्थित राहण्यासाठी, राज्यभरातील लाखोंच्या संख्येने श्री सदस्य खारघर मध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रावर दासबोधाच्या निरूपणातून सत्कर्माची दिशा देऊन समाज मनावर अमुलाग्र बदल केले असून मुख्य वारसा त्यांना त्यांचे वडील स्व. परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी यांचे कडून लाभलेला आहे. आज सकाळी ठीक 10:30 वाजता खारघर येथील आंतरराष्ट्रीय कार्पोरेट मैदानावर, हा महाराष्ट्र भूषण सन्मानाचा सोहळा पार पडणार आहे.

भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण हा सन्मान प्रदान करण्यात येणार असून, सन्मान सोहळा प्रदान प्रसंगी संपूर्ण परिसरावर व आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर, हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीचा वर्षाव करण्यात येणार आहे. दासबोधातून समर्थ रामदास स्वामी यांनी जो लोककल्याणाचा विचार प्रबोधन मांडले आहेत, ते सर्व आधुनिक काळातील समाजापर्यंत नेण्याचे कार्य स्व. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी व त्यांचा वारसा लाभलेले चिरंजीव पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले आहे. कोकण प्रदेशातून रेवदंड्यातून सुरू झालेला हा अध्यात्मिक प्रवास, देश्याच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचे मौलिक प्रबोधनाचे काम, पद्मश्री डाॅ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले आहे. सर्व जाती धर्माचे लोक, अत्यंत गुण्यागोविंदाने एकमेकांसोबत राहून, अध्यात्मिक कार्य व सामाजिक कार्य करतात हे या परिवाराचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. स्व. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे लाखो भक्त आज, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, आरोग्य स्वच्छता, ग्राम स्वच्छता, महिलांचा सन्मान यासारख्या कार्यासाठी अहोरात्र झटत आहेत. ही एक स्व. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची दैवी संपत्ती समजणे योग्य होय. महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण विश्वाला संदेश देणाऱ्या पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासारख्या पूजनीय व्यक्तीला महाराष्ट्र भूषण सन्मानाने गौरवणे, हे पुढील भावी पिढ्यांना प्रेरणा देणारा एक संदेश समजणे योग्य ठरेल.


आजच्या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनगुंटीवार तसेच धर्माधिकारी कुटुंबीय तसेच महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने आलेले श्री सदस्य उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमातील मुख्य भाग म्हणजे भारताचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top