सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे 18 पैकी 17 उमेदवार विजयी , 1 जागी अपक्ष उमेदवाराला संधी.--

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)


 सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला 18 पैकी 17 जागांवर विजय मिळवला असून, 1 जागेवर अपक्ष उमेदवाराला संधी मिळाली आहे .सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत, महाविकास आघाडीच्या व्यापारी गटातून चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रशांत पाटील मजलेकर हे विजयी झाले असून, दुसरे अपक्ष उमेदवार वारद कडाप्पा यांचा विजय झाला आहे. त्याचप्रमाणे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोसायटी गटातील सर्व म्हणजे 11 जागांवर व ग्रामपंचायतच्या गटातील 4 जागांवर, अशा एकूण 15 जागांवर महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.


 सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील विजयी उमेदवारांची नावे अशी--

 प्रशांत पाटील मजलेकर( महाविकास आघाडी), वारद कडाप्पा( अपक्ष) तसेच महाविकास आघाडीचे इतर गटातील- सोसायटी गट- सर्वसाधारण - सुजय शिंदे, स्वप्निल शिंदे,(जत) ,बापूसाहेब बुरसे, संग्राम पाटील, बाबगोंडा पाटील,( मिरज), महेश पवार, रामचंद्र पाटील,( कवठेमहांकाळ), महिला गट- शकुंतला बिराजदार, (जत) कुसुम कोळेकर,( कवठेमहांकाळ) ,ओबीसी गट- बाबासाहेब माळी(, जत) भटक्या विमुक्त जाती जमाती- बिराप्पा शिंदे (जत )ग्रामपंचायत गट- आनंदराव नलवडे (मिरज ),रावसाहेब पाटील (कवठेमहांकाळ), अनुसूचित जाती गट- शशिकांत नागे( सांगली), आर्थिक दुर्बल गट -रमेश पाटील (जत )हमाल तोलदार गट -मारुती बंडगर असे विजयी उमेदवार आहेत. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार काँग्रेस पक्षाचे नेते विशाल पाटील, श्रीमती जयश्रीताई पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती. सांगलीचे खासदार संजय काका पाटील व जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या पॅनलला मैत्री, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली आहे. एक अपक्ष उमेदवार सोडला तर महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाल्याने, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता, एक हाती महाविकास आघाडीला मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे .सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमुळे, यापुढील होणाऱ्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top