पुण्यातील नवले पुलाजवळ, खोबरेल तेलाचा टँकर उलटून, 24000 लिटर खोबरेल तेल रस्त्यावर वाया.--

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )



गेले काही दिवस पुण्यातील नवले पुलाच्या परिसरात वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. काल नवले पुलाजवळ खोबरेल तेलाचा भरलेला टँकर उलटून, जवळपास 24000 लिटर खोबरेल तेल रस्त्यावर पसरून वाया गेले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या वतीने ,नवलेपुलानजीक परिसरात अपघातांची मालिका लक्षात घेऊन तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. नवलेपुलाच्या महामार्गावर रंबलर्स बसवण्यात आले आहेत . आज पुन्हा खोबरेल तेलाचा भरलेला टँकर नवलेपुलाजवळ  उलटा होऊन 24000 लिटर खोबरेल तेल वाया गेले आहे. सदरचा खोबरेल तेलाचा भरलेला टँकर हा साताऱ्यावरून मुंबईला खोबरेल तेल घेऊन निघाला होता .खोबरेल तेलाच्या भरलेल्या टँकरचे ब्रेक फेल झाल्याने नरे येथील सेल्फी पॉइंट जवळ अपघात झाला. खोबरेल तेलाने भरलेला टँकर उलटा झाल्याने ,महामार्गावर सर्वत्र तेलच तेल पसरलेले होते. गेले काही दिवस नवले पुलाजवळ सातत्याने अपघात घडत आहेत. खोबरेल तेलाच्या भरलेल्या टँकर उलटा झाल्याने कोणतीही जीवित हानी झाली नसून चालक सुखरूप पणे बचावला आहे.

दरम्यान हा अपघात टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने, दुभाजकाला धडकून खोबरेल तेलाचा टँकर महामार्गावर उलटला. नवले पुलाजवळ महामार्गावर जणूकाही तेलाची नदी वाहू लागली आहे असा भास खोबरेल तेलाचा टँकर उलटल्याने होत होता. आज खोबरेल तेलाचा टँकर उलटल्याने महामार्गावरील वाहतूक संथ गतीने चालू असून वाहतूक विभागाचे पोलीस राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून तेल सत्वर काढण्याचे काम चालू आहे. दरम्यान नागरिकांनी रस्त्यावरून जाताना काळजी घेण्याचे आवाहन वाहतूक पोलीस प्रशासनाने व राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top