सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या इतिहासात, 26 वर्षात पहिल्यांदा वीज बिल घोटाळा प्रकरणी, एसआयटी स्थापन.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)

 


आज मुंबई येथे लोकायुक्त यांच्या कार्यालयात सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका विरोधातील विज बिल घोटाळ्या बाबत सविस्तर सुनावणी झाली. सदर घोटाळे बाबत लोकआयुक्त यांनी फार गांभीर्याने टिपण्या केल्या आहेत. सदर बाबतीत तीन सदस्यांची एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे. सदर एसआयटीमध्ये महापालिका अधिकारी, गव्हर्मेंट चे सीए तसेच एसपी दर्जाचे पोलीस अधिकारी यांची संयुक्त एसआयटी यांनी, आठ आठवड्यात याबाबत सकल चौकशी करून, मा. लोकाआयुक्त यांच्याकडे अहवाल सादर करायचा आहे. पुढील सुनावणी 03 जुलै 2023 रोजी ठेवण्यात आलेली आहे तसेच आम्ही म्हणणे मांडताना  महाराष्ट्रभर अशा पद्धतीने घोटाळे झाले असण्याची शक्यता आहे. त्याबाबत मा. लोकायुक्तांनी, नगर विकास खात्याचे उपसचिव सुनावणीस हजर होत्या, त्यांना सुद्धा आदेश दिलेले आहेत.

 महाराष्ट्रातील इतर महापालिका मध्ये अशा प्रकारचे घोटाळे झालेले आहेत किंवा नाही याचे चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच महानगरपालिकेचे महासभा व स्थायी समितीच्या सभा यांचे प्रोसिडिंग कायम अपूर्ण असते. त्याबाबत सुद्धा सभा झाल्यानंतर तात्काळ प्रोसिडिंग लिहिण्यात यावे असे आदेश माननीय आयुक्तांना देण्यात आलेले आहेत.तसेच इतर 16 मुद्यांवर सविस्तर सुनावणी घेण्यात येणार आहे असे सागितले. सदर सुनावणीसाठी वि. द. बर्वे ,सतीश साखळकर,तानाजी सरगर,सुरेश साखळकर, मनपा आयुक्त सुनील पवार,उपायुक्त राहुल रोकडे,गिरीश फाटक आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top