" कोल्हापूर जिल्ह्यास आरोग्य दिनानिमित्त खासदार संजय मंडलिक यांची भेट. माता व बालसंगोपन हॉस्पीटलसाठी केंद्र शासनाकडून 34 कोटी रु. निधी मंजूर "

0

प्रतिनिधी: मिलिंद पाटील.


केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने कोल्हापूरमध्ये एक अद्यावत व प्रशस्त असे माता व बालसंगोपन हॉस्पीटल उभारले जाणार असून यासाठी 34 कोटीचा निधी मंजूर आहे. 100 बेडचे हे हॉस्पीटल होणार असून शाहू नगरीतील माता व बालकांना उत्कृष्ठ व उच्च दर्जाची आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील माता बालकांच्या मृत्युचे प्रमाण पुर्णपणे कमी होणार आहे. यावेळी बोलताना खासदार मंडलिक म्हणाले की, या हॉस्पीटलसाठी 34 कोटी रुपये मंजूर करुन घेतले आहे. यासाठी गेल्या तीन वर्षापासून माझा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. सदरचे हॉस्पीटल 100 बेडचे असून 85 एकरामध्ये उभे राहणार आहे. याच्या  मंजूरीसाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य मंत्री मा. डॉ. मनसुख मांडविया, आरोग्य राज्यमंत्री श्रीमती मा.डॉ. भारती पवार, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीससाहेब त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. दिपक केसरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या हॉस्पीटलमुळे कोल्हापूरच्या वैभवात भर पडणार असून शाहूंच्या भूमीतील माता व बालकांना उत्कृष्ठ व जलद आरोग्य सुविधा मिळणार आहे. माता व बालक यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी या हॉस्पीटलची मदत होईल.हे हॉस्पीटल उभारणे कामी निधी उपलब्ध होण्याकरिता केंद्रीय आरोज्य राज्यमंत्री मा. डॉ. भारती पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करुन या कामाची तात्काळ मंजूरी घेतली. या हॉस्पीटलचे काम लवकरात लवकर पुर्ण व्हावे अशा सुचना यावेळी खासदार मंडलिक यांनी दिल्या. कोरोना महामारीच्या काळात मतदार संघातील जनतेच्या आरोग्यासाठी खासदार फंड निधी व मंडलिक फौंडेशनमार्फत रु. 2 कोटीहून अधिक निधी दिल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाणसाहेब यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे स्वागत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले. त्याचबरोबर आभार श्री राहूल सुर्यवंशी यांनी मानले. यावेळी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. प्रदिप दिक्षित वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिरिष कांबळे, आरोग्य उपसंचालक डॉ. प्रेमचंद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top