महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतच्या 3666 जागांच्या पोटनिवडणुकीची, राज्य निवडणूक आयोगाच्या कडून घोषणा, 18 मे 2023रोजी मतदान होणार.----

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी )



महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीच्या 3666 जागांसाठी, राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीच्या जागांसाठी मतदान दि. 18 मे 2023 रोजी होणार असून, राज्यात सुमारे 2620 ग्रामपंचायतीमधील  3666 रिक्त सदस्य संख्या व जवळपास सरपंच पदाच्या 126 रिक्त पदांसाठी, निवडणुका होणार आहेत. राज्यातील ग्रामपंचायतीमधील रिक्त सदस्य संख्या असलेल्या 3666 जागांसाठी व 126 सरपंचपदांच्या रिक्त असलेल्या जागांसाठी पोटनिवडणूक होणार असून, दि. 18 मे 2023 रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे आज देण्यात आली आहे. जवळपास निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झालेली असून, रिक्त झालेल्या सदस्यांमध्ये निधन झालेले सदस्य, राजीनामा दिलेले सदस्य ,सदस्यत्व रद्द झालेले सदस्य, अन्य कारणामुळे रिक्त झालेले सदस्य यांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ता. 25 एप्रिल 2023 पासून 02 मे 2023 या कालावधीत दाखल करता येणार असून, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत. दि. 3 मे 2023 रोजी उमेदवारी अर्जाची छाननी असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम ता. 08 मे 2023 दुपारी 3:00 वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून, दि. 18 मे 2023 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे.

दरम्यान राज्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम क्षेत्राच्या भागात दुपारी 3:00 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. या सर्व जागांची मतमोजणी ता. 19 मे 2023 रोजी रोजी होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.




Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top