कागलच्या 5 स्टार एम.आय.डी.सी. सांगाव हद्दीतील कोट्यावधी रुपयाच्या मुरमाची खुलेआम चोरी. कागल तहसीलदार कार्यालयाची गांधारी ची भूमिका---

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

 (अन्सार मुल्ला)


कागल तहसीलदार कार्यालय अंतर्गत येणाऱ्या 5 स्टार एमआयडीसी लगत एका उत्खनन करणाऱ्या व्यक्तीने निव्वळ 100 ब्रास उत्खननाच्या परवान्याचा गैरवापर करत हजारो ब्रास मुरूम गेल्या महिन्याभरापासून उत्खनन करून विक्रीचा सपाटा लावला आहे. सदरच्या उत्खननाचा पुरावा म्हणून आम्ही चित्रण केले असता संबंधित व्यक्तीने आम्ही दिवसभरातून सलग 8 तास उत्खनन करत असून गेले महिनाभर आमचे अविरत उत्खनन चालू आहे. आणि आम्ही परवाना काढून उत्खनन करणे चालू ठेवले आहे असे सांगितले. संबंधित व्यक्तीकडे आम्ही परवानगी चौकशी केली असता त्यांनी फक्त 100 ब्रास परवाना घेतला असून कोल्हापुरातील एका मोठ्या व्यवसायिकांनी तेलवेकर नावाच्या व्यक्तीने कागल तहसीलदार कार्यालयात फक्त 100 ब्रास उत्खननाचा पैसे भरून परवाना घेतला. मात्र गेल्या महिन्याभरापासून 3000 ब्रास ऊन अधिक उत्खनन करून अक्षरशः महसूल प्रशासनाच्या अप्रत्यक्ष परवानगीने लूट लावली आहे. दररोज 100 ब्रास याप्रमाणे अविरत उत्खनन सुरू आहे. या विभागाचे मंडल अधिकारी किंवा संबंधित तलाठी यांनी अक्षरशः डोळे झाक करत शासनाची लूट होत असताना कोणतीही कारवाई केली नाही. स्वतः तहसीलदारांनी या ठिकाणी भेट दिली तर लाखो रुपयाचा मुरूम कसा चोरीला गेला आहे हे स्पष्ट होईल.


 सदरचा मुरूम लुटीचा प्रकार असाच सुरू राहिला तर या माळावर थोडा देखील मुरूम शिल्लक राहणार नाही. संबंधित ठेकेदारावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्यांनी केलेली लूट त्यांच्याकडून वसूल करण्यासाठी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रामाणिक अधिकाऱ्यांना पाठवून किंवा स्वतः जाऊन कारवाई करण्याची मागणी या परिसरातील काही सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे. या मुरूम चोरांना महसूल मधील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी पाठीशी घातल्याने आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही अशी मग्रुरीची भाषा त्यांच्याकडून सुरू आहे. संबंधित ठेकेदाराला स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करून कायदा काय असतो हे दाखवून देणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा मुरूम चोरावर आळा बसेल. 


कागल तहसीलदार कार्यालय अंतर्गत येणाऱ्या विविध ठिकाणाच्या उत्खननाबाबत सर्व ठिकाणची सुरू असलेली लूट आम्ही आमच्या पुढील भागात संबंधितांच्या नावानिशी बातमीद्वारे उघड करणार आहोत....

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top