देशात कोरोनाचे 6,155 नवे रुग्ण; पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांवर, एप्रिलचे आकडे टेन्शन वाढवणारे

0

 प्रतिनिधी : मिलिंद पाटील.


देशभरात सध्या कोरोना प्रादुर्भाव (Covid-19 Updates) सध्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 6,155 नवे रुग्ण आढळले आहेत. यासह, कोरोनाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 5.63 टक्क्यांवर पोहोचला आहे, तर साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 3.47 टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 31,194 वर पोहोचली आहे. 


दुसरीकडे, शुक्रवारी देशात कोरोनाचे 6,050 आणि गुरुवारी 5,335 रुग्णांची नोंद झाली होती. 6 महिन्यांनंतर देशात एकाच दिवसात इतके रुग्ण आढळले. कोरोनाची वाढती प्रकरणं पाहता सरकार अलर्ट मोडमध्ये आलं आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत मनसुख मांडविया यांनी कोरोनाच्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राज्यांसह कोरोना लसीकरणासंदर्भात आढावा घेतला.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top