सांगलीत आज सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या 81 वा जन्मोत्सवानिमित्त सांगली जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये साकडे !

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

( अनिल जोशी )


 सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या 81 व्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्था ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ राबवत आहे. वर्ष 2017 पासून या अभियानांतर्गत हिंदू समाजात हिंदु राष्ट्र आणि आदर्श राष्ट्र उभारणीविषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्येक धर्माभिमानी हिंदू, तसेच हिंदुत्वनिष्ठ यांच्या प्रयत्नांना ईश्‍वराच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. या कार्याला देवतांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी संपूर्ण भारतभर साकडे घालण्यात येत आहे. 


याच पार्श्‍वभूमीवर सांगली जिल्ह्यात 33 हून अधिक मंदिरांमध्ये साकडे घालण्यात आले. यात प्रामुख्याने मिरज येथील संत वेणास्वामी मठ, काशी विश्‍वेश्‍वर देवालय, अंबाबाई मंदिर, सांगलीतील गावभागातील श्री मारुति मंदिर, हरिपूर येथील बागेतील गणपति, तुंग येथील श्री मारुति मंदिर, ईश्‍वरपूर येथील यमाई मंदिर, भवानी माता मंदिर, विटा येथील भैरवनाथ मंदिर, पलूस येथील पद्मावती मंदिर यांसह अन्य मंदिरांचा समावेश आहे. या वेळी देवतेच्या चरणी ‘भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, तसेच विश्‍वकल्याण व्हावे’, यांसाठी प्रार्थना करण्यात आली. हिंदूंच्या मनात हिंदु राष्ट्र स्थापनेचा विचार वारंवार रुजवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात आध्यात्मिक बळ देणारे संत-महंत यांनाही उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, यासाठीही प्रार्थना करण्यात आली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, सनातन प्रभातचे वाचक, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे यांचे प्रमुख, सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.

  सांगली जिल्ह्यात विविध मंदिरांची स्वच्छता !

  जन्मोत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध भागातील मंदिराची स्वच्छताही करण्यात येत आहे. हिंदु धर्मात ‘मंदिरे’ हीच धर्माचे प्राण आहेत. या प्राणाला अर्थात मंदिरांना जपणे आणि त्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येकच हिंदूचे प्रथम कर्तव्य आहे. मंदिरे ही सात्त्विकतेची स्रोतच आहेत. हाच हेतू ठेवून विविध मंदिराचा परिसर आणि इतर परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे. समाजाने साधना करावी आणि देवतांचे आशीर्वाद मिळावे यांसाठी ठिकठिकाणी प्रवचने घेण्यात येत आहेत.Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top