महाराष्ट्र सहकार क्षेत्रातील आघाडीच्या कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये, दि साहेबराव देशमुख व मराठा सहकारी बँकेचे लवकरच विलीनीकरण होणार.--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी )महाराष्ट्र सहकार क्षेत्रातील दिग्गज आणि आघाडीच्या असलेल्या कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेने, मुंबईतील दि साहेबराव देशमुख सहकारी बँक व मराठा सहकारी बँक या दोन्हीही सहकारी बँकांना आपल्यात सामावून घेण्याचा निर्णय घेतला होता व त्यानुसार कॉसमॉस बँकेच्या नुकत्याच झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार आता कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये, मुंबईतील दि साहेबराव देशमुख सहकारी बँक व मराठी सहकारी बँक या बँकांना विलीनीकरण करून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात दिग्गज असलेली कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेने आज पर्यंत जवळपास 16 सहकारी बँकांना, आपल्या कार्यकक्षेत विलीनीकरण करून घेतले आहे. मुंबईमधील असलेल्या दि साहेबराव देशमुख बँकेच्या जवळपास 11 शाखा व 224 कोटी रुपयांचा व्यवसाय आहे, तसेच मराठा सहकारी बँकेच्या जवळपास 7 शाखा असून, 162 कोटी रुपयांचा व्यवसाय आहे. सहकार क्षेत्रातील दिग्गज असलेली कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकचा लवकरच एक विलीनीकरणाचा प्रस्ताव, रिझर्व्ह बँकेकडे पाठवला जाणार असून, दि साहेबराव देशमुख बँकेतच्या व मराठा सहकारी बँकेच्या शाखांमुळे कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचा महाराष्ट्रात विस्तार फार मोठ्या प्रमाणात होणार आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top