सांगलीतील सांगली रेल्वे स्टेशनवर, जोधपुर बेंगलोर एक्सप्रेसच्या गाडीचे व रेल्वे प्रवाशांचे जल्लोषात, उस्फूर्तपणे स्वागत.---

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी ) 


सांगलीत आज सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आलेल्या जोधपुर बेंगलोर एक्सप्रेसचे रेल्वे प्रवाशांसह आगमन झाले. त्यावेळी जोधपुर बेंगलोर एक्सप्रेस रेल्वेचे व रेल्वे प्रवाशांचे उत्स्फूर्तपणे जोरदार स्वागत करण्यात आले. रेल्वे गाडी नं १६५३३ - बेंगलोर क्सप्रेस व गाडी नं १६५३४ बेंगलोर - जोधपूर एक्स्प्रेस  या गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे.यातील पहिली गाडी नं १६५३४ बेंगलोर - जोधपूर एक्स्प्रेस सांगली रेल्वे स्टेशन वर आज सोमवार ता १० एप्रिल रोजी दुपारी १ वाजता थांबली.या गाडीचे स्वागत करण्यात आले.ही गाडी बेंगलोर सिटी येथून रविवारी संध्याकाळी ५ वाजता सुटून यशवंतपूर, हिंदुपूर, धर्मावरम, अनंतपुर, गुंतकल, बेल्लारी, होस्पेट, कोपल, गदग, हुबळी, धारवाड, मिरज येथे थांबून सोमवारी दुपारी १ वाजता सांगली रेल्वे स्टेशन येथे थांबली.सांगली रेल्वे स्टेशनवरून निघून ही गाडी सातारा, पुणे, मुंबई (कल्याण), मुंबई (वसई रोड), वलसाड, सुरत, आनंद, वडोदरा, अहमदाबाद, आबू रोड, मारवाड, पाली-मारवाड, भगत की कोठी येथे थांबून जोधपुर ला मंगळवारी दुपारी २:३० वा पोचेल
परतीच्या प्रवासात गाडी नंबर जोधपुर बंगलोर एक्सप्रेस जोधपुर हून बुधवारी सकाळी सहा वाजता निघून भगत की कोटी, पाली-मारवाड, मारवाड, आबू रोड, अहमदाबाद, आनंद, बडोदा, सुरत, वलसाड, मुंबई( वसई रोड),  मुंबई (कल्याण), पुणे, सातारा येथे थांबून गुरुवारी सकाळी ७ वाजता सांगली रेल्वे स्टेशनवर थांबेल.सांगली रेल्वे स्टेशन वरून सुटून ही गाडी पुढे मिरज, बेळगाव, लोंढा, धारवाड, हुबळी, गदग, कोपल, होस्पेट, बेल्लारी, गुंतकल, अनंतपुर, धर्मावरम, हिंदुपूर, यशवंतपूर येथे थांबून शुक्रवारी पहाटे २:३० वाजता बेंगलोर सिटी येथे पोहोचेल.

या गाडीमुळे सांगली जिल्हा राजस्थान गुजरात कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यांशी जोडला गेला आहे.नागरिक जागृती मंच ने सांगली जिल्ह्यातील प्रवाशांना आवाहन केले आहे की जास्तीत जास्त लोकांनी सांगली रेल्वे स्टेशन वरून या रेल्वे गाडीचे तिकीट बुक करावे व आधी इतर स्टेशनवरून बुक केलेल्या तिकिटांचे बोर्डिंग स्टेशन सांगली असे लवकरात लवकर बदलून घ्यावे.नागरिक जागृती मंचचे नेते सतीश साखळकर, कॉम्रेड उमेश देशमुख, विजय शहा, शरद शहा, व्यंगचित्रकार रोहित कबाडे,रोहित गोडबोले, नगरसेवक प्रकाश मुडके, बापूसाहेब माने, जितेंद्र कुंभार, वीरू असकी, अभिजीत कोल्हापुरे, अनिल कवठेकर, जगन्नाथ वाघमोडे, तानाजी सलगर, प्रशांत भोसले, सुरेश साखळकर इत्यादी उपस्थित होते. रेल्वे गाडीचे चालक श्री.यादव आणि श्री.सिंह होते आणि गार्ड म्हणून श्री.सुंदर उपस्थित होते. उपस्थित सर्व रेल्वे चालकं, गार्डसह रेल्वे प्रवाशांचे हार्दिक स्वागत सांगली रेल्वे स्टेशनवर उस्फूर्तपणे जोरदार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top