सांगलीतील इस्लामपूर येथे, जय भारत संकल्प अभियान राबवण्यासाठी, सांगली जिल्हा सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न.--

0

 

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)सांगली जिल्ह्यातून राबवण्यात येणाऱ्या जय भारत  संकल्प अभियानांतर्गत, इस्लामपूर येथे एक बैठक संपन्न झाली असून, सांगली जिल्हा सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले हे निरीक्षक म्हणून हजर राहले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे प्रत्येक ब्लॉक आणि जिल्ह्यातून जय भारत संकल्प अभियान राबवण्यात येणार असून,  इस्लामपूर शहर काँग्रेस कमिटी व काँग्रेस औद्योगिक विभागाच्या वतीने, इस्लामपूर येथे हे अभियान होणार असून, सेवादला चे सांगली जिल्हा अध्यक्ष अजित ढोले यांनी या कामी पक्षनिरीक्षक म्हणून काम पाहिले. काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुल जी गांधी यांच्या अदानिंच्या वीस हजार कोटी रुपयांच्या  व्यवहाराबद्दल  केलेल्या वक्तव्याच्या बाबतचा सुड घेत, भाजप सरकारने  कर्नाटक येथे  प्रचाराच्या दरम्यान   केलेल्या वक्तव्याचा  विपर्यास करत,दोन वर्षाची शिक्षा ठोठावत खासदारकी रद्द करण्याच्या भाजप सरकारच्या षडयंत्र विरोधात ,पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांना आदानी उद्योग समुहामध्ये वीस हजार कोटी कुठून आले या बाबत विचारणा करणारे पत्र  पोस्टकार्ड वर लिहून पाठवण्यात आले.

यावेळी शहर अध्यक्ष राजेंद्र शिंदे सरकार, उपाध्यक्ष ॲड आकिब जमादार, वाळवा तालुका उपाध्यक्ष जयवंत जाधव, प्रदेशचे ॲड आर. आर. पाटील , सेवादलाचे संदीप मोहिते, संदीप तांदळे, औद्योगिक विभाग च्या प्रदेश सचिटणीस ॲड मनीषा रोटे , सोनं पाटील, संदिप  पाटील, शिवलिंग वाघमारे ,पल्लवी जाधव आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top