सांगलीतील आर. आर. पाटील होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. पराग बापट यांची, एम. यु. एच. एस .नाशिकच्या होमिओपॅथी फॅकल्टीच्या पॅरा क्लीनिकल बोर्ड ऑफ स्टडीज च्या को ऑप्शन सदस्य पदी निवड.--

0

 

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी )

सांगलीतील होमिओपॅथिक क्षेत्रातील नावाजलेले मेडिकल कॉलेज असलेल्या, आर. आर. पाटील होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य व तज्ञ होमिओपॅथिक डॉ. श्री .पराग बापट यांची, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक च्या होमिओपॅथी फॅकल्टीच्या पॅरा क्लिनिकल बोर्ड ऑफ स्टडीजच्या को ऑप्शन सदस्य पदी निवड झाली आहे .सांगलीतील आर .आर .पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हे होमिओपॅथिक शैक्षणिक क्षेत्रातील एक नावाजलेले कॉलेज असून, प्राचार्य व तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टर श्री. पराग बापट यांच्या अधिपत्याखाली कॉलेज सध्या कार्यरत आहे. 

   आर .आर .पाटील मेडिकल कॉलेजचे प्राचार्य, तज्ञ होमिओपॅथिक डॉ. पराग बापट यांचं होमिओपॅथिक क्षेत्रातील योगदान हे फार मोठे असून, आज झालेल्या महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिकच्या होमिओपॅथिक फॅकल्टी च्या पॅरा क्लिनिकल बोर्ड ऑफ स्टडीज च्या को ऑप्शन सदस्य पदी निवड झाल्यामुळे, सांगलीतील होमिओपॅथिक क्षेत्रात एक मानाचा दीपस्तंभ उभारला गेला आहे .आर. आर. पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज प्राचार्य डॉ पराग बापट यांच्या झालेल्या निवडीबद्दल ,सांगलीतील बऱ्याच मान्यवर नेत्यांनी, व्यक्तींनी, संस्थानी अभिनंदन करून त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top