"आदर्श"च्या जाण्याने व्हनाळीसह पंचक्रोशीवर पसरली शोककळा...!

0

 - शेण खड्ड्यात पडून गुदमरून मृत्यू


- एकुलता एक मुलगा गेल्याने पाटील कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्कः
प्रतिनिधी- नंदकुमार तेली

मामाच्या घरी गेला असताना खेळता खेळता शेण खड्ड्यात पडून अवघ्या सहा वर्षाच्या आदर्शचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. हे वृत्त समजताच व्हनाळीसह पंचक्रोशीवर शोककळा पसरली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अवघ्या ६ वर्षाच्या आदर्शने मनमिळावू स्वभावाने आपली एक ओळख निर्माण केली होती. सकाळी नऊच्या सुमारास खेळता खेळता तो शेण खड्ड्यात पडला.काही वेळाने आदर्श दिसत नसल्याने कुटुंबीय व नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. काही वेळाने आदर्श शेण खड्ड्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्याला तत्काळ खड्याबाहेर काढले व औषध उपचारासाठी दवाखान्यात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. हे वृत्त गावात वाऱ्यासाखे पसरले. त्याच्या जाण्याने गावासह पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

- एकुलता एक मुलगा गेल्याने पाटील कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर

आदर्शचे वडील अजित पाटील व आई अमृता यांना आदर्श हा एकुलता एक मुलगा होता. पती-पत्नींचा स्वभाव मनमिळावू असल्यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यांच्याप्रमाणेच आदर्शही मनमिळावू असल्याने तो सर्वांना आवडता बनला होता. एकुलता एक मुलगा असा अचानक निघून गेल्याने पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

- व्हनाळीसह संपूर्ण पंचक्रोशीतून  हळहळ व्यक्त केली जात आहे.

आदर्शच्या वडिलांचा व्हनाळी गावामध्ये गिरणी व्यवसाय असून आई अमृता या गृहिणी आहेत.
जन्मजात आलेल्या आजारामुळे आदर्श च्या अवयवांची पूर्णत: वाढ झाली नव्हती. तो बरा व्हावा यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या आजारावरील होणारा खर्चाची परवा न करता कोल्हापुरातील हॉस्पिटलमध्ये औषधोपचार करण्यास सुरुवात केली. त्याच्या औषध उपचारावर लाखो रुपयांचा खर्च झाला. मात्र, तो आता कुठे त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊन चांगला झाला असताना अचानक ही दुर्दैवी घटना घडली. आणि त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आदर्शच्या अचानक जाण्याने व्हनाळीसह संपूर्ण पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सोमवार दि. 17 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9 वाजता रक्षा विसर्जन विधी करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top