लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हा दाखल ; एकास अटक , उर्वरितांचा शोध सुरू---

0


- मशिन विक्री व्यवसायातून १० लाखांवर फसवणूक.


 कोल्हापूर प्रतिनिधी : मिलिंद पाटील 


सुपारी फोडणे , कापूस वाती बनवणे आणि कापूर तयार करण्याच्या मशिनची विक्री व्यवसायातून सुमारे १० लाख १५ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.याप्रकरणी ब्राईट साईड एंटरप्रायजेस कंपनीच्या नऊ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. त्यातील संचालक अमृत राजेंद्र महाडिक ( रा . प्रगतीनगर , पाचगाव , ता . करवीर ) याला आज अटक केली असल्याचे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक इकबाल महात यांनी  सांगितले.याची फिर्याद महावीर महाविद्यालयाजवळील प्रियदर्शनी ऊर्फ अंजली विजयसिंह ठाकूर यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली. कंपनीचे संचालक अमृत राजेंद्र महाडिक ( रा . प्रगतीनगर , पाचगाव , ता . करवीर ) , आशा शिरदवाडे ( रा . आंबेवाडी , ता . अमृत महाडिक करवीर ) , नीलेश टिपुगडे , विनायक शिंदे , हर्ष गिरजकर , प्रशांत सुर्वे ( चौघे रा . पाचगाव ) , पूनम बाबासो मोरे ( रा . मोरेवाडी , ता . करवीर ) , ऋतिका पुजारी आणि शैलेश शिंगोरे ( दोघे रा . कोल्हापूर ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत . त्यापैकी महाडिकला अटक केली असून , उर्वरितांचा शोध सुरू असल्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक इकबाल महात यांनी सांगितले . 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ब्राईट साईड एंटरप्रायजेस कंपनीने त्यांच्या व्यवसायाची जाहिरात केली होती. त्याला अनुसरून अशी फसवणूक केली. सुपारी कट करून १० तासाला ३ हजार रुपये कमवा , तसेच मशिनद्वारे कापूर बनवून १० तासाला २ हजार रुपये कमवा , नो रिजेक्शन वगैरे माहितीद्वारे जाहिरात केली . त्यातून विश्वास संपादन केला. फिर्यादी व इतरांनी संपर्क साधला असता मशिन व कच्च्या मालासाठी रोख व बँकद्वारे रकमा घेऊन फसवणूक करण्याच्या हेतूने दिलेले मशिन सुस्थितीत चालत नाही. त्याला कच्चा मालही ठरल्याप्रमाणे दिला नाही.मशिन दुरुस्तीसाठी देऊन परत केले नाही म्हणून फसवणूक झाल्यामुळे गुन्हे दाखल झाल्याचेही उपनिरीक्षक इकबाल महात यांनी सांगितले . फिर्यादी ठाकूर यांनी कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधला . त्यावेळी १० तासांत २ ते ३ हजार रुपयांचे उत्पादन तयार करणारे मशिन देण्याचे आमिष जाहिरातीप्रमाणे कंपनीचे संचालक आणि कर्मचाऱ्यांनी दाखविले. तसेच कापूर तयार करणाऱ्या मशिनसाठी आवश्यक कच्चा माल पुरवण्याची हमी देऊन पैसे भरून घेतले. प्रत्यक्षात मात्र निकृष्ठ , नादुरुस्त मशिन दिले . वारंवार तक्रारी करूनही वेळेत कच्च्या मालाचा पुरवठा केला नाही यासह अन्य कारणातून सुमारे १० लाख १५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली . मशिन आणि कच्च्या मालासाठी भरलेले पैसे परत मागितल्यानंतर कंपनीच्या संचालकांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे .

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top