वि.मं.व्हनाळीचे उज्ज्वल यश जिल्ह्यात कागल तालुका "टाॅप"

0


- प्रज्ञाशोध परीक्षेत गौरी जाधव

जिल्ह्यांत - १७ वी


व्हनाळी प्रतिनिधी: 

- (" जनप्रतिसाद न्यूज - विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).


नुकत्याच झालेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत कागल तालुक्यातील व्हनाळी गावातील वि.मं.व्हनाळीच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी बजावत उज्ज्वल यश संपादन केले. तर कागल तालुका जिल्ह्यात टॉप ठरला.


जिल्हा परिषद कोल्हापूर -शिक्षण विभाग (प्राथमिक) आयोजित प्रज्ञाशोध परीक्षा सन २०२२/२३ मध्ये सर्वसाधारण जिल्हा गुणवत्ता यादीतील  वि.मं.व्हनाळी शाळेचे विद्यार्थी असे...


 इयत्ता चौथी -  गौरी अमित जाधव -१६० गुण (जिल्ह्यांत -१७ वी).,  स्वरांजली संजय कुळवमोडे - १४४ गुण ( जिल्ह्यांत -२५ वी)., सोहम् कृष्णात पोवार - १३६ गुण (जिल्ह्यात २९ वा). 


जिल्ह्यात कागल तालुका "टाॅप"...

 कागल तालुका जिल्ह्यात टाॅप -१० मध्ये १ तर टाॅप १०० मध्ये ३८ विद्यार्थी यशस्वी.  इयत्ता सातवी - तनिष्क मधुकर कुळवमोडे -१६८ गुण ( जिल्ह्यात ११ वा). कागल तालुका जिल्ह्यात टाॅप -१० मध्ये फक्त कागलचे -७ विद्यार्थी तर टाॅप -१०० मध्ये -४४ विद्यार्थी यशस्वी.


- वि.मं.व्हनाळी शाळेची जिल्ह्यात उत्तुंग भरारी... 

कागलची शिष्यवृत्तीप्रमाणे प्रज्ञाशोध परीक्षेतही जिल्ह्यात उत्तुंग भरारी घेतली. यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक :  इयत्ता चौथी - बाळकृष्ण चौगले., इयत्ता सातवी - साधना माने.,  मुख्याध्यापक - बबन चौगुले यांचे प्रोत्साहन व मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवून शाळेचा नावलौकिक वाढवल्याबद्दल वरील सर्व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.

- यांची मिळाली प्रेरणा---  

मुख्याध्यापिका आनंदी जाधव,

केंद्रप्रमुख शेंडूर सुनिता किणेकर, 

शि.वि.अधिकारी सारिका कासोटे,        

गटशिक्षणाधिकारी,कागल डाॅ.जी.बी.कमळकर यांची यशस्वी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. तर अध्यक्ष, उपाध्यक्षा शा.व्य.समिती सर्व सदस्य वि.मं.व्हनाळी. मा.सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य ग्रा.पं.व्हनाळी,ता.कागल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top