महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी व बारावी परीक्षेचे निकाल यंदाच्या वर्षी वेळेत जाहीर होणार.--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी )
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या यंदाच्या वर्षीच्या दहावी व बारावी परीक्षेचे निकाल वेळेत जाहीर केले जाणार असून, सर्वसाधारणपणे बारावी परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या शेवटी ते जूनच्या पहिल्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल सर्वसाधारणपणे 10 जूनच्या आत लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या, यंदाच्या वर्षीच्या दहावी व बारावीच्या परीक्षा, या ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात आल्या होत्या. कनिष्ठ महाविद्यालयाच्या आठ दिवस चाललेल्या संपामुळे व उत्तर पत्रिका तपासणार नसल्याच्या भूमिकामुळे, निकाल वेळेत लागेल का नाही ?याची चर्चा चालू होती, शिवाय सरकारी कर्मचारी व शिक्षकांनी पुकारलेल्या संपामुळे, दहावी व बारावीचे निकाल वेळेत लागतील का नाही? याची शक्यता वाटत होती. परंतु नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने, दहावी व बारावीचे निकाल हे कोणत्याही परिस्थितीत ठरलेल्या वेळेत लावणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे दहावी बारावी विद्यार्थ्यांचे पुढील प्रवेशाचे मार्ग सुकर होतील अशी चिन्हे दिसत आहेत .शिवाय कोणत्याही शैक्षणिक अडथळ्याविना ,यंदाच्या वर्षीची प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर चालू होईल असे वाटते.
Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top