सांगली जिल्ह्यातील जत मधील स्वानंद सुखनिवासी सद्गुरू भिमदास महाराज करांडे मठ गोंधळवाडी येथे, काँग्रेस पक्षाचे कसबा पेठ पुणे मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांचा जाहीर नागरी सत्कार समारंभ संपन्न.---

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी )

सांगली जिल्ह्यातील जत मधील स्वानंद सुखनिवासी सद्गुरू भिमदास महाराज करांडे मठ गोंधळेवाडी (ता.जत) यांच्या वतीने,काँग्रेस पक्षाचे कसबा पेठ पुणे मतदारसंघाचे नवनिर्वाचित आ.रवींद्र (भाऊ) धंगेकर यांचा सत्कार केला.काँग्रेस पक्षाचे कसबा पेठ मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर हे जत तालुक्यात पहिल्यांदाच आले होते.या कार्यक्रमास मुख्य उपस्थिती म्हणून, ह.भ.प. अंबादास महाराज करांडे ,ह.भ.प.राजेंद्र महाराज करांडे उपस्थित होते .आजच्या झालेल्या जाहीर नागरी सत्कार समारंभात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व जत मधील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

भाजपच्या बालेकिल्ल्यात आ. रवींद्र (भाऊ) धंगेकर यांनी मिळवलेला विजय विशेष आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या चुकीच्या धोरणांना जनतेने दिलेले हे सणसणीत उत्तर आहे.यापुढेही जनमताचा कौल काँग्रेसच्या विचारांना बळ देईल व देशात संविधान पुरस्कर्ते शासन सत्तेत येईल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला. 

यावेळी कार्यक्रमास ह. भ. प.अंबादास महाराज करांडे, ह.भ.प.राजेंद्र महाराज करांडे यांच्या सह काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी ,विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top