भारतात वापरल्या जाणाऱ्या "सूर्यफूल तेलाची" ,आरोग्यास अत्यंत उपयुक्तपूर्ण असलेली माहिती.--

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 ( अनिल जोशी )



सूर्यफुलाचे तेल आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, कार्बोहाइड्रेट, आयरन आणि सोडियम उपलब्ध असते. सूर्यफुलाच्या तेलाच्या नियमित सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्याचबरोबर याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पचनक्रियाही मजबूत होते. स्वयंपाक करताना तुम्ही सूर्यफुलाच्या तेलाचा वापर करू शकतात. सूर्यफुलाच्या तेलाचा वापर केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

 

हृदय निरोगी राहते


(The Heart Remains Healthy-Sunflower Oil Benefits)

सूर्यफुलाच्या तेलाचे नियमित सेवन केल्याने हृदय दीर्घकाळ निरोगी राहू शकते. त्याचबरोबर हे तेल कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. सूर्यफूल तेलामध्ये ॲलिक ॲसिड आढळून येते, जे हृदयाची काळजी घेण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात सूर्यफूल तेलाचा समावेश करू शकतात.


 पचनक्रिया मजबूत होते


 (Digestion Is Strengthened-Sunflower Oil Benefits)

सूर्यफूल तेलाचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होऊ शकते. हे तेल पचण्यासाठी खूप सोपे असते. इतर तेलांपेक्षा सूर्यफूल तेल खूप हलके असते, त्यामुळे ते पचायला सोपे जाते. सूर्यफूल तेलाचे नियमित सेवन केल्याने पोटाचे आरोग्य निरोगी राहू शकते.


 रोगप्रतिकारशक्ती वाढते


 (Increases Immunity-Sunflower Oil Benefits)

सूर्यफूल तेलाच्या मदतीने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. या तेलामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. सूर्यफूल तेलाच्या नियमित सेवनाने तुम्ही सर्दी, खोकला आणि इतर मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात.


सूर्यफूल तेलाचे नियमित सेवन केल्याने, आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर त्वचेचा रंग सुधारण्यासाठी ,सूर्यफूल तेलाचा फार मोठा उपयोग आरोग्यासाठी होतो. मात्र हे सूर्यफूलतेल वापरताना शुद्ध, सात्विक व नैसर्गिक पद्धतीने लाकडी घाण्यावर काढलेले असावयास पाहिजे. सदरचा लेख तज्ञांची माहिती संकलित करून जनहितार्थ प्रसारित करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top