महाराष्ट्र राज्यात व्याघ्रपकल्पाच्या धर्तीवर, हत्ती प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात, केंद्र सरकारशी तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना.-- वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार.

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी )


महाराष्ट्र राज्यात व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर, हत्ती प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात, केंद्र सरकारशी तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात सध्या हत्तींची संख्या फार वाढत असून, त्यांचा वावर, उपद्रव नागरिक वसाहतीमध्ये शिवाय गावामध्ये वाढत आहे. राज्यातील व्याघ्र प्रकल्पाबाबतीत जसा ,वाघांची संख्या वाढत असताना विचार केला गेला ,तशीच विचारात्मक प्रकल्प योजना म्हणजे हत्ती प्रकल्प चालू करण्यासंबंधी ,केंद्र सरकारशी तातडीने पत्रव्यवहार करा अशा सूचना सुधीर मुनगुंटीवार यांनी वनाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

महाराष्ट्र राज्यातील वन्य हत्ती वावर नियंत्रणासाठी देखील, हत्ती संवादकांची मदत घेण्याचा विचार, महाराष्ट्र शासन करत आहे असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी केले आहे. काल सह्याद्री अतिथीगृहात कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरातील वन्य हत्ती व इतर वन्य जीवांच्या वाढत्या उपद्रवाबाबतीत चर्चा झाली सध्याच्या परिस्थितीत कोल्हापुरातील वन्य गवा प्राण्यांच्या उपद्रवासंबंधी देखील, गंभीर चिंता बैठकीत व्यक्त केली गेली. राज्यातील वनाधिकाऱ्यांना तातडीने याबाबतीत निर्देश देऊन ,व्याघ्र प्रकल्पच्या धर्तीवर हत्ती प्रकल्प सुरू करण्यात संदर्भात केंद्र सरकारशी पत्रव्यवहार जलद रीतीने करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top