मुंबईत आज मराठी पत्रकार परिषदेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले.प्रकाश बाळ जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार तर लोकमत कोल्हापूरचे संपादक वसंत भोसले यांना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर.--

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

 (अनिल जोशी) 


मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिला जाणारा "दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार" यंदा ज्येष्ठ पत्रकार, चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांना देण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी आज मुंबईत केली.. परिषदेचे अन्य पुरस्कार देखील यावेळी जाहीर करण्यात आले आहेत. मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारिणीची विशेष बैठक काल परिषदेच्या मुंबईतील कार्यालयात पार पडली.बैठकीत २०२२ चे पुरस्कार नक्की करण्यात आले. त्यानुसार यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रकाश जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे.२५ हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.यापुर्वी दिनू रणदिवे, मा. गो. वैध, पंढरीनाथ सावंत आदि वरिष्ठ पत्रकारांना हा पुरस्कार दिला गेला आहे.


प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे पुरस्कार कोल्हापूर लोकमतचे संपादक वसंतराव भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे. पत्रकार शशिकांत सांडभोर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टीव्ही पत्रकाराला दिला जाणारा पुरस्कार "न्यूज १८ लोकमत" चे मिलिंद भागवत यांना देण्यात येणार आहे.पत्रकार प्रमोद भागवत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा "प्रमोद भागवत शोध पत्रकारिता पुरस्कार" सकाळचे पत्रकार मारूती कंदले यांना दिल जात आहे.

महिला पत्रकारांसाठी दिला जाणारा "सावित्रीबाई फुले पत्रकारिता पुरस्कारासाठी" यावर्षी मॅक्स महाराष्ट्रच्या प्रियदर्शनी हिंगे यांची निवड करण्यात आली आहे.अकोला येथील पत्रकार भगवंतराव इंगळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पुरस्कार यंदा धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर यांना दिला जात आहे.मराठवाड्यातील पत्रकारांसाठी असलेला नागोजीराव दुधगावकर पुरस्कार यावर्षी छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार स. सो. खंडाळकर यांना देण्यात येत असून कोकणातील पत्रकारासाठीचा रावसाहेब गोगटे पुरस्कार संगमेश्वर येथील ज्येष्ठ पत्रकार जे. डी. पराडकर यांना दिला जात आहे.

दत्ताजीराव तटकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रायगड जिल्ह्यातील पत्रकारास दिला जाणारा पुरस्कार न्यूज 18 लोकमतचे रायगड प्रतिनिधी मोहन जाधव यांना जाहीर करण्यात आला आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत मे च्या तिसऱ्या आठवड्यात मुंबईत पुरस्कार वितरण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीस एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विभागीय सचिव दीपक कैतके, मुंबई अध्यक्ष राजा आदाटे आदि उपस्थित होते.पुरस्कार प्राप्त सर्व पत्रकारांचे मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top