सांगलीत आज जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती काँग्रेस भवन येथे साजरी.--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी )

सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने ,थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती, काँग्रेस भवन सांगली येथे साजरी करण्यात आली. प्रारंभी सेवा दलाचे बाबगोंडा पाटील व राजू पाटील यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व बाकीच्यांनी अभिवादन करून आणि फुले वाहून आदरांजली वाहिली.

यावेळी बोलताना सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले यांनी, महात्मा ज्योतिबा फुले यांनी, शेतकरी पददलित घटक व महिलांच्या उन्नतीसाठी सतत कार्य केले आहे. त्यांनी पुणे येथील भिडे वाड्यामध्ये स्त्री शिक्षणाची मूर्तमेढ रोवली. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर व त्यांच्या जीवनमानावर प्रकाश टाकणारा शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ त्यांनी लिहिला. आज भाजपचे सरकार शेतकरी विरोधी काम करीत आहे ,तसेच महिलांच्यावर अत्याचार होत आहेत. अशावेळी महात्मा फुले सारख्या समाजसुधारकांची प्रेरणा घेऊन, सध्या परिस्थितीमध्ये आंदोलन उभे केले पाहिजे असे सांगितले.

यावेळी सेवा दलाचे प्रदेश संघटक सचिव पैगंबर शेख यांनी स्वागत प्रास्ताविक केले व शेवटी आभार कार्याध्यक्ष अरुण पळसुले यांनी मानले. यावेळी शहर जिल्हा काँग्रेसचे सचिव मौलाली वंटमोरे,विठ्ठलराव काळे, शिवाजी सावंत ,अजित माने, सचिन पाटील ,सुभाष पट्टण शेट्टी, भीमराव चौगुले, नामदेव पठाडे, विश्वास यादव, सुरेश गायकवाड, शैलेंद्र पिराळे  ,कवलापूरचे सुरेश पाटील ,मुफित कोळेकर, आटपाडी तालुका काँग्रेस सेवादलाचे उपाध्यक्ष श्री यादव, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top