महिलांसाठी रोड सेफ्टी आणि महिला सक्षमीकरण या विषयावर जागरूकता व्हावी याकरिता हिरकणी फाउंडेशन आणि आरटीओ कोल्हापूरच्या वतीने आज पिंक रॅलीचे आयोजन---

0

 प्रतिनिधी: मिलिंद पाटील.
हिरकणी फाउंडेशन आणि आरटीओ कोल्हापूरच्या वतीने आज कोल्हापूरमध्ये पिंक रॅली घेण्यात आली. कोल्हापूर मधील सर्व स्तरातील महिलांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला होता. अनेक महिलांनी आपल्या कारला रोड सेफ्टी आणि वुमन एम्पॉवरमेंट चालू असताना खूप छान सजावट केलेली दिसत होती. या सजावटीसाठी आरटीओ च्या वतीने आकर्षक बक्षीसे देखील देण्यात आली.या रॅलीसाठी कोल्हापूरचे आरटीओ दीपक पाटील, हिरकणी फाउंडेशनच्या संस्थापक, अध्यक्षा सौ. जयश्री शेलार, हिरकणी टीमचे पंकज दास, बिग एफ.एम. कोल्हापूर कार डीलर असोसिएशन, विकास बहुलेकर, मधुरा नलावडे, अजित कौर, डॉ. वैदेही, यांचे बहुमोल सहकार्य लाभले. महिला दिन आणि या रॅलीच्या अनुषंगाने हिरकणी फाउंडेशन च्या वतीने कोल्हापूर मध्ये 24 मार्चला 9 ते 20 वर्षे वयोगटातील गरजू 300 मुलींसाठी मोफत गर्भाशय कॅन्सर एच.पी. व्ही. लसीकरण हा कार्यक्रम राबवण्यात आला होता.Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top