सांगलीत आज शहा हॉस्पिटल शंभर फुटी नजीक पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्यावतीने, मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

( अनिल जोशी )

 


सांगलीत आज शहा हॉस्पिटल, शंभर फुटी रोड नजीक ,रमजाननिमित्त पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्यावतीने मुस्लिम बांधवांच्यासाठी दावत - ए  इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या, त्यांच्याशी संवाद साधला. येथील शंभर फुटी रोडवरील शहा हॉस्पिटलनजीक या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. हाजी मौलाना फाजिऊर शेख यांनी रोजाची दुवा व नमाज पठण केले. इफ्तारसाठी खजूर, फळे, ज्यूस, व जेवण ची व्यवस्था करण्यात आली होती. 


यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, डॉ. सिकंदर जमादार, पद्माकर जगदाळे, शेखर माने, किशोर जामदार, इंद्रीस नायकवडी, असिफ बावा, नगरसेवक मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, संतोष पाटील, अभिजीत भोसले, मयूर पाटील, करीम मेस्त्री, तोफिक शिकलगार, रवींद्र वळवडे, अमर निंबाळकर, रज्जाक नाईक, महेश साळुंखे, अय्याज नायकवडी, हाजी मुनीर अत्तार,डॉ. तोहिद मुजावर, कय्युम पटवेगार, युनूस महात, अनिल आमटवणे, डी जी मुलाणी, किरण जगदाळे, आणि मोठ्या संख्येने हिंदू-मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top