महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांना टोल माफी करण्यासाठी प्रयत्न करू; त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडू.-- कामगार मंत्री सुरेश खाडे .

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी ) 


सांगलीत आज केंद्रीय पत्रकार संघाच्या तिसऱ्या वर्धापन दिनाचा सोहळा साजरा झाला."क्या न्यूज" ने दिले पत्रकारांना उत्पन्नाचे साधन, "क्या न्यूज" येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्यांचा आवाज होईल असे प्रतिपादन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केले.सांगली येथील विश्रामबाग येथे झालेल्या केंद्रीय पत्रकार संघाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांना आर्थिक सक्षम बनवणाऱ्या क्या न्यूज या चॅनलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.  पुढे बोलताना नामदार सुरेश खाडे म्हणाले की क्या न्यूज हा पत्रकारांना आर्थिक सक्षम बनवणारा मैलाचा दगड बनणार आहे. देश पातळीवरील या चॅनलचे ॲप सर्वांनी आपल्या मोबाईल मध्ये घ्यावे. याच्या माध्यमातून सर्वसामान्यांना व सर्वांनाच आपल्या भागातील बातम्या पाहता व वाचता येतील.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर क्षीरसागर यांनी केले. या कार्यक्रमासाठी केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर, क्या न्यूजचे संस्थापक देवेश गुप्ता, जेष्ठ पत्रकार धनंजय पाठक, पोलीस निरीक्षक पवार, बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते आनंदा पाटील, मनसेचे राज्य उपाध्यक्ष पुंडलिक जाधव, चंद्रशेखर क्षीरसागर, अमोल जाधव महेश भिसे, नयना पासी, रवींद्र लोंढे, संजय पवार, सदानंद माळी, समाजसेवक घेवदे, अजित कुलकर्णी, ऋषी माने, प्रदीप थोरात, गौरव शेटे व इतर पत्रकार आणि मान्यवर उपस्थित होते. 


यानंतर बोलताना जेष्ठ पत्रकार धनंजय पाठक म्हणाले की केंद्रीय पत्रकार संघटना निश्चितपणे पत्रकारांना आर्थिक सक्षम बनवेल. क्या न्यूज हा भारतातील पहिला असा चॅनेल आहे जो पत्रकारांना सन्मानाने व आर्थिक सक्षमतेने जगायला सक्षम बनवत आहे. यानंतर बोलताना क्या न्यूज चे संस्थापक देवेश गुप्ता यांनी क्या न्यूज ची माहिती सांगितली व ते कसे पत्रकारांना आर्थिक सक्षम बनवणार हे देखील सांगितले. सामान्य जनतेला क्या न्यूजच्या माध्यमातून आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी एक सुवर्णसंधी असल्याचे त्यांनी सांगितले. 


यानंतर मनसेचे उपाध्यक्ष जाधव यांनी पत्रकारांच्याच मुळे आम्ही जगापुढे येतो पण पत्रकारांच्या पाठीशी आपण सक्षमपणे राहिले पाहिजे. पत्रकारांच्या वेदना आपण समजून घेतल्या पाहिजेत. आम्ही निश्चितपणे पत्रकारांच्या मागण्या आणि त्यांच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करू असे ते म्हणाले. बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते मोहन पाटील यांनी शेतकरी वर्गाला निश्चितपणे न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार नेहमीच सोबत असतात असे सांगितले. विविध मान्यवरांची मनोगते व सत्कार यावेळी करण्यात आला.यानंतर बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर यांनी केंद्रीय पत्रकार संघटना विविध मागण्याद्वारे पत्रकारांना हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.पत्रकारांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून टोल माफ करणे, जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकारांना मोफत जागा मिळवून देणे, पत्रकारांवर हल्ला झाला तर पत्रकार संरक्षण हक्क कायद्यांतर्गत त्यांना न्याय मिळवून देणे अशा विविध मागण्या केल्याचे सांगितले. यानंतर मंत्री सुरेश भाऊ खाडे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. केंद्रीय पत्रकार संघाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. रविंद्र लोंढे हे जिल्हाध्यक्ष तर सचिव पदी महेश भिसे यांची निवड जाहीर करण्यात आली. आभार ज्येष्ठ पत्रकार सदानंद माळी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top