सांगलीत जिल्ह्यात वीज मीटरच्या तुटवड्याने ग्राहकांना मनस्ताप, भर उन्हाळ्यात ग्राहकांची कुचंबणा.--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी )

सांगली जिल्ह्यात वीज मीटरचा तुटवडा असल्याने, वेळेत वीज मीटर बसवणे महावितरण कार्यालयास अशक्य झाले असल्याने, ग्राहकांना मनस्ताप होत आहे. व्यावसायिक व घरगुती नवीन वीज कनेक्शन घेण्याबाबत ,वीज मीटरचा तुटवडा असल्याने ,वीज मीटर नवीन कनेक्शन देणे महावितरण कार्यालयात सध्याच्या परिस्थितीत शक्य नाही. त्यामुळे ग्राहकांना देखील नवीन वीज जोडणी कनेक्शन वेळेत मिळत नसल्याने, मनस्ताप होत आहे. दरम्यान वीज मंडळाकडे सुरक्षा अनामत रक्कम भरूनहि, 15 दिवस ते एक महिना वीज मीटर उपलब्ध होत नसल्याने, नवीन वीज मीटर जोडण्याच्या बाबतीत तसेच जुने नादुरुस्त मीटर बदलण्याच्या बाबतीत फार मोठी अडचण निर्माण झाली आहे. सध्या वीज मंडळाच्या कार्यालयात, अनेक नागरिक रोज- रोज हेलपाटे मारत असून ,सांगली जिल्ह्यात व शहरात मीटर तुटवड्यामुळे, नवीन कनेक्शन ग्राहकांना देणे जवळपास बंद झाले आहे.

दरम्यान राज्य सरकारने वेळेत वीज मीटर खरेदी न केल्याने, ही आजची परिस्थिती ओढावली आहे .शिवाय याचा मनस्ताप नागरिकांना होत असून, सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात ग्राहकांची व नागरिकांची सदरहू वीज मीटर मीटर तुटवड्याच्यामुळे ससेहोलपट चालू आहे. सरकारने तातडीने मीटर उपलब्ध करून देऊन, ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिक जागृती मंचचे नेते सतीश साकळकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top